एखादा प्रवास सुरु होतो. त्या मार्गावरुन आपण मार्गक्रमण करत राहतो. प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या मनात निरनिराळ्या शंकाकुशंकानी थैमान घातलेले असते. प्रत्यक्ष प्रवासाला सुरवात केल्यावर मात्र आपल्याला त्या प्रवासातील मजा अनुभवायला मिळते. नवनवीन गोष्टीनी आपली समज समृध्द होत जाते. अचानक निर्माण झालेल्या लहानमोठ्या प्रश्नांवर सहज मात करत आपण पुढच्या दिशेने चालत राहतो. मग प्रवास हा अर्ध्यात येतो. एकादी मोठी अडचण निर्माण होते. तेव्हा आपल्याला मागे जाणे ही तेवढेच असते व पुढे जाणेही तेवढेच असते. या टप्प्यावर एकदा का आपण पोहोचलो की यानंतर कधीही माघार घ्यायची नाही. ही पक्की खूणगाठ मनात बांधून ठेवली पाहिजे. चला तर व्यवसायाच्या वाटेवरचा हा प्रवास अर्ध्याहून पुढे आला आहे. तेंव्हा आता यशस्वी उद्योजक होईपर्यंत निरंतर चालत राहू या.आता आपण दुसऱ्या भागाच्या अंतिम टप्प्यावर आहोत. प्रत्यक्ष सुरवात कशी करायची? याबाबत जाणून घेतले, त्यांनंतर भांडवल उभारणीचे वेगवेगळे पर्याय पाहिले. कोणत्या सरकारी परवानग्या लागतील ते पाहिले? या परवानग्याचे फायदेही समजून घेतले. या परवानग्या मिळवाव्यात कशा? त्यासाठी आपल्याला कोण मदत करेल? या परवानग्या मिळवण्यासाठी किती गुंतवणूक (पैसे) लागेल? हे जाणून घेऊया.
👍प्रोप्रायटरी व पार्टनरशिप – हा स्थानिक पातळीवर नोंद केला जाणारा उद्योग आहे. त्यामुळे तेथील प्रशासकीय व्यवस्थेनुसार यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेची पूर्तता करावी लागते. आता जवळ जवळ सर्वच ठिकाणी याची ऑनलाईन नोंदणी करणे शक्य झाले आहे. ग्रामपंचायत हद्दीमधील व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र हे प्रोप्रायटरी साठी लागणारे अधिकृत डॉक्युमेंट आहे.
👍एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. कंपनी, लि. कंपनी – याच्या नोंदणीसाठी भारत सरकारची एकमेव वेबसाईट(संकेतस्थळ) आहे ती म्हणजे –http://www.mca.gov.inया वेबसाईट वर सर्व काही आढळून येते. इथे आपण ठरवलेले नाव आधी कोणत्याही कंपनीने घेतलेले नसावे. कारण एकाच नावाच्या दोन कंपन्या भारतात नोंद केल्या जाऊ शकत नाहीत. या सर्वांसाठी लागणारी काही समान कागदपत्रापैकी DIN व DSC ही अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आहेत. हे दोन्ही फार्म ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पध्दतीने भरता येतात. हे सर्व प्रत्येक जण स्वतः करु शकतो. त्यासाठी स्वतःचा MCA21 यावेबसाईट चा अभ्यास असावा. मात्र चुका टाळण्यासाठी सीए किंवा सीएस कडून हे काम करुन घेणे अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये त्यांचा अनुभव व ज्ञान उत्तम असल्याने ते तुम्हाला सहजरित्या ही कामे पूर् करुन देतात. शिवाय कंपनी नोंद करुन देणाऱ्या काही ऑनलाईन कंपन्या सुध्दा आहेत. एलएलपी ०८-१२ हजारात, प्रा. लि. कंपनी १०-२० हजारात तर लि. कंपनी ३५-५० हजारात निर्माण करता येते.
अगदी आठवडाभर ते १० दिवसातही कंपनी रजिस्टर होऊ शकते. आता भारतात कंपनी निर्माण करणे सोपे झाले आहे. गुगल मध्ये ease of doing business in India असे search केले तर आपल्याला याविषयी अधिक माहिती मिळेल. पूर्वी पेक्षा आता नवीन सरकारने अनावश्यक व कालबाह्य ठरलेल्या लायसन्स रद्द केल्याने ही प्रक्रिया आणखीच सुलभ झाली आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी पूर्वी १५० पेक्षा जास्त लायसन्स लागत आता ती संख्या २० ते ३७ परवानग्या लागतात.
कर खात्याच्या परवानग्या ही आता GST मुळे कमी होतील. सर्व प्रकारचे कर जाऊन एकच मध्यवर्ती कर लागू झाल्यास उद्योजक अधिक जोमाने आपला उद्योग वाढवणार आहेत. त्यामुळे आता सर्वात योग्य वातावरण आहे. योग्य वेळ आहे व आपण या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार झाल आहोत तर वाट पाहू नको उशीर करु नका. आपला उद्योग रजिस्टर करा व पासपोर्ट काढून ठेवा. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये व्यवसाय करण्याची संधी कोणत्याही क्षणी तुम्हाला लाभेल तेव्हा तयार रहा.
या लेखासोबत procedure, लागणारा कालावधी, व त्यासाठी लागणारी गुंतवणूक याचा तक्ता जोडला आहे . त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करुन पुढे जाऊ या.
– अमोल चंद्रकांत कदम
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti