ब्रँड म्हणजे?: एक ब्रॅंड म्हणजे उत्पादन, सेवा किंवा संकल्पना असते, जी त्याच श्रेणीमधील इतर उत्पादने, सेवा किंवा संकल्पनेपेक्षा अधिक लोकप्रिय असते. म्हणजे ब्रॅंडची मार्केटमध्ये इतरांपेक्षा खास ओळख असते. ज्याच्याशी लोक सहजपणे communicate करू शकतात, जी सतत लोकांच्या नजरेसमोर असते. ब्रॅंड बर्याच वेळा लोगो किंवा ग्राफिक प्रेझेंटेशनच्या रूपात व्यक्त केले जातात. उदा. इंटेल मायक्रोचिप वापरणार्या सर्व संगणक निर्मिती करणार्यांच्या CPU वर Intel inside चा लोगो असतो. तसेच इतर उत्पादने आहेत. ज्यांची ओळख त्यांच्या लोगोवरुन किंवा टॅगलाईन वरून होते. ब्रॅंडनेममुळे एखाद्या व्यवसाय किंवा उत्पादनांना मार्केटमध्ये विशेष ओळख व सन्मान मिळतो. जे त्या उत्पादनांना इतर स्पर्धकांच्या उत्पादनांपेक्षा सरस व प्रभावी बनविते. आज मार्केटमध्ये असे अनेक ब्रॅंड्स आहेत. उदा. ॲपल, कोका-कोला, डॉमिनोझ, चितळे बंधू, अमृततुल्य, गोदरेज इत्यादी. जे मार्केटमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत व ग्राहक मोठ्या प्रमाणावर त्यांची उत्पादने विकत घेतात. ते इतर सामान्य उत्पादनांचा विचार करीत नाहीत त्याला ब्रॅंड म्हणू शकतो.
Products vs Brands: एखादे उत्पादन कंपनी बनवते, जे ग्राहक पैसे देऊन विकत घेऊ शकतात, परंतु ब्रॅंड्स हे एका ब्रॅंडनेमअंतर्गत सर्व उत्पादनांच्या बाबत ग्राहकांच्या आकलन शक्ती अपेक्षा व अनुभवातून मोठे होतात. उदा. मारुती सुझुकी किंवा रॉयल एनफिल्ड हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठे ब्रॅंड्स आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या गाड्या (Products) आहेत. परंतु त्यांच्या गाड्यांची विक्री ही त्यांच्या ब्रॅंडनेममुळेच होते, ही ब्रॅंडची खरी ताकद आहे. सामान्य उत्पादने व एका ब्रॅंडनेम अंतर्गत असलेली उत्पादने यात खूप फरक असतो. उत्पादने कॉपी करता येतात किंवा त्यांना पर्यायी उत्पादनांच्या उपयोगाने बदलता येतात, परंतु ब्रॅंड हे कायमच युनिक (Unique) असतात. उत्पादने कालबाह्य होऊ शकतात, परंतु ब्रॅंड हे निरंतर राहतात. उत्पादने अल्प कालावधीसाठी यशस्वी होऊ शकतात, परंतु ब्रॅंड्स हे दीर्घकाळांपर्यंत निरंतर यश मिळवू शकतात व ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करतात.
ब्रॅंड नेम: ब्रॅंड नेम किंवा ट्रेड नेम हे कंपनीने त्यांच्या विशिष्ट उत्पादनांना, सेवांना किंवा संकल्पनांना दिलेले नाव असते. काही ब्रॅंड नेम त्या कंपन्यांच्या संस्थापकांच्या नावाने प्रचलित होतात. उदा. मॅकडोनाल्डस, गोदरेज, चितळे इत्यादी. ब्रॅंडनेम हे एक विशेष नाव आहे जे व्यावसायिकांना त्यांच्या विशिष्ट उत्पादनांसाठी ओळख निर्माण करून देते व इतर स्पर्धकांपासून वेगळे करते, ब्रॅंडनेममुळे मार्केटमध्ये तुमची खास ओळख व विश्वासार्हता निर्माण होते.
ब्रॅंड लोगो: ब्रॅंड लोगो हे मार्केटमध्ये तुमची कंपनी उत्पादने, ब्रॅंड पटकन ओळखता यावे यासाठी तयार केलेले एक ग्राफिक चिन्ह, डिझाईन, सिम्बॉल किंवा शैलीकृत (stylized) नाव असते, परंतु लोगो म्हणजे केवळ एक डिझाईन किंवा चिन्ह नसून तुमच्या कंपनीच्या ब्रँडिंगसाठी महत्वाचा पाया असतो व ग्राहकांसाठी तुमच्या ब्रॅंडची तोंडओळख करून देण्याचे एक माध्यम असते. उदा. बीएमडब्ल्यु, मर्सिडीज कार, मॅकडोनाल्डस, डॉमिनोज यांची ओळख त्यांच्या लोगोवरून होते.
ब्रॅंड टॅगलाईन: ब्रॅंडची ओळख हीच सर्वात मौल्यवान गोष्ट असते. म्हणूनच ब्रॅंड अवेअरनेस वाढवण्यासाठी कंपन्या जाहिरातीवर व मार्केटिंगवर लाखो, करोडो रुपये खर्च करतात. ब्रॅंडनेम, लोगो, याबरोबरच टॅगलाईन मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचे मूल्यवर्धन करण्यासाठी व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी संलग्न असा संदेश उपयोगी पडतो, तो म्हणजे ब्रॅंड टॅगलाईन. टॅगलाईन म्हणजे जाहिरातीमध्ये वापरली जाणारी एखादी क्रॅचफ्रेज किंवा स्लोगन (घोषवाक्य) किंवा एखादी आकर्षक पंचलाईन असते. मार्केटिंगमध्ये टॅगलाईन म्हणजेच तुमचा बिझनेस मंत्र असे मानले जाते. तुम्ही कोण आहात व तुम्ही कशासाठी आहात, हे लोकांसमोर व्यक्त करण्यासाठी टॅगलाईनचा उपयोग होतो. प्युमाची ‘Just Do it‘, रिलायन्सची ‘करलो दुनिया मुठ्ठी में‘, किटकॅटची ‘Have a break, Have a Kit Kat!’ या टॅगलाईन अत्यंत लोकप्रिय झाल्या.
ब्रॅंड इंट्रो: Brand Intro आपला ब्रॅंडच्या माध्यमातून ग्राहकांशी उत्तमरित्या कनेक्टेड राहण्याची संधी देते. आपण आपल्या ब्रॅंडच्या माध्यमातून ग्राहकांना काय ऑफर करू इच्छितो. याबद्दल प्रभावीपणे माहिती देणे व ग्राहकांनी त्याकडे आकर्षित होण्यासाठी Brand Intro महत्वपूर्ण कार्य करते.
ट्रेडमार्क: ट्रेडमार्क हा एक शब्द किंवा चिन्ह असते. ज्यामुळे उत्पादने व सेवांचा मूळस्त्रोत ओळखता येतो. एखाद्या कंपनीच्या व्यवसायाच्या ब्रँडिंगमध्ये ट्रेडमार्कचे महत्त्व असाधारण असते. त्याचा वापर गेल्या कित्येक दशकांपासून होत आहे. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनमुळे ब्रॅंड व ब्रॅंड व्हॅल्यू सुरक्षित राहते. ट्रेडमार्क हा तुमच्या उत्पादनांना इतर ब्रॅंडच्या समान उत्पादनांपासून वेगळे करतो. त्यांना वेगळी ओळख निर्माण करून देतो.
डोमेन नेम: जसे ब्रॅंडनेम व्यवसाय उत्पादने व ब्रॅंडला परिभाषेत करते. तुमचे ग्राहक, बिझनेस कम्युनिटी, मार्केट यामध्ये तुमची ओळख निर्माण करते, त्याचप्रमाणे डोमेन नेम हे बिझनेसची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ओळख व अस्तित्व निर्माण करते. डोमेन नेम हा तुमच्या बिझनेस वेबसाईटचा वेब ॲड्रेस असतो. ती ऑनलाईन प्रॉपर्टी असते. डोमेन नेम संभाव्य ग्राहकांना तुमची उत्पादने व सेवा खरेदी करण्यास मदत करते. त्यामुळे उचित डोमेन नेम निवडणे अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे.
ब्रॅंड व्हिजिबिलिटी: ब्रॅंड व्हिजिबिलिटी किंवा दृश्यमानता हा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा एकच शक्तिशाली मार्ग आहे. याद्वारे आपली उत्पादने उत्तम आहेत व त्यावर विश्वास ठेवून खरेदी करू शकता हे ग्राहकांना परिभाषित करता येते. त्यामुळे ग्राहकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करून ती खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करता येते. ऑनलाईन ब्रॅंड, दृश्यमानता हा आधुनिक काळातील सर्वात प्रभावी मार्ग आहे. यासाठी वेबसाईट, सोशल मीडिया पेजेस, ब्लॉग्स, प्रेस रिलीज, युट्यूब व्हिडीओ व इतर ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करता येईल.
सारांश: ब्रॅंडिंग हा कोणत्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यामुळे व्यवसायावर एकंदरीत उत्तम परिणाम होतो. ब्रॅंडिंगमुळे ग्राहकांचा तुमच्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो. तुमच्या ब्रॅंडची विश्वासार्हता वाढते व ब्रॅंड अवअरनेस अधिक वाढू लागतो. तुमच्या व्यवसायाचे मूल्य वाढून ग्राहकांच्या संख्येत निरंतर वाढ होत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्वजण उदा. पार्टनर्स, गुंतवणूकदार, कर्मचार्यांना अभिमानास्पद वाटते व ते समाधानी होतात.
नवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके विकत घेण्यासाठीhttp://bit.ly/nabooks
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
Copyright © 2020 Navi Arthkranti