पार्टनरशिपमधील वाद : एक बिझनेस कन्सल्टंट म्हणून काम करीत असताना मला रोज अनेक व्यावसायिक, उद्योजक, कंपन्यांचे कॉल्स येत असतात. यात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे पार्टनरसोबत वाद झाल्याने व्यवसायात अडचणी येत असल्याचे दरवर्षी सरासरी ३५ ते ४० कॉल्स मला येतात. बरेच व्यावसायिक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करतात, ही एक चांगली गोष्ट आहे. ‘एक से भले दो’ हि ही चांगली गोष्ट आहे. सहसा पार्टनरशिपमध्ये दोन मित्र, दोन भावंडे किंवा दोन नातेवाईक असतात. कारण ओळखीच्या माणसांसोबत पार्टनरशिपमध्ये करून व्यवसाय करण्यात सुरक्षितता वाटते; परंतु दुर्दैवाने कधी कधी अशी परिस्थिती तयार होते की पार्टनर्समध्ये वाद होऊ लागतात. कधीकधी व्यवसाय चांगला चालू असताना देखील वाद होतात. अगदी सख्या भावंडात, जिवलग मित्रांत मोठमोठे वाद झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. ज्यांना आपण चांगले ओळखतो व ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो. पार्टनरशिपमधील वाद हा सर्वात कटू अनुभव असतो. यावेळी तुमच्या व्यवसाय वाढीला ब्रेक लागतो, प्रसंगी व्यवसाय बंदही पडू शकतो, दोन भिन्न व्यक्ती एकच व्यवसाय करत असतील तर वाद होतातच.
अनुभव : अशाच पार्टनरशिपमधील वादाला कंटाळून एक व्यावसायिक माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आले होते. त्यांचे वय ५० वर्षाहून अधिक होते. त्यांना इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षाचा अनुभव व ज्ञान होते. ते कोणताही निर्णय विचार करून घेत असत तर त्यांचा बिझनेस पार्टनर हा तरुण होता. तो अत्यंत उत्साही होता, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल चांगले ज्ञान व कौशल्य त्याच्याकडे होते. त्याला व्यवसायविषयक निर्णय वेगाने घेण्याची सवय होती. तसेच स्वतःच्या निर्णयावर त्याला नेहमी कमालीचा आत्मविश्वास असायचा. तो अत्यंत आक्रमक व धाडसी निर्णय घेणारा होता. त्यांची दोघांचीही काम करण्याची पध्दत एकदम भिन्न होती. त्यातच वयामध्ये खूप अंतर असल्याने ‘जनरेशन गॅप’ची समस्याही कधीकधी उद्भवायची. त्यामुळे अनेक बाबतीत त्यांचे मतभेद होते, त्यामुळे कधीकधी वादविवाद होऊ लागले होते. त्याचबरोबर कोणी एकाने तडजोड करायची म्हटले तर दोघांचाही ‘EGO’ आडवा येत असे. कधीकधी तरुण पार्टनर वेगाने निर्णय घेत असे, त्याच्याकडून चुका होत असत. त्यामुळे दुसऱ्याला वाटायचे की, तो त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा अपमान करतो आहे की काय. तर तरुण पार्टनरला वाटायचे की, व्यवसायामध्ये ७० ते ८० टक्के काम तर मीच करतोय, मग प्रॉफिटमध्ये ५०-५० टक्के वाटा का असावा? अशा बारीकसारीक कारणांमुळे एकमेकांत वाद होऊ लागले, व्यवसायातील कलहामुळे वातावरण बिघडू लागले होते.
उपाय : साधारणपणे दोन पार्टनर्स एकत्र येऊन कोणताही व्यवसाय सुरू करतात, त्यावेळी नफ्यातील समान हिस्सा मिळावा अशी धारणा असते. खरे तर पार्टनरशिपमध्ये ५०-५० टक्के हिस्सा असला पाहिजे असे काही नाही. प्रत्येकाची आपली आपली क्षमता असते. प्रत्येकाच्या कामाची पध्दत, जबाबदारी, कौशल्य भिन्न असते. एखादा पार्टनर व्यवसायात कमी काम करत असेल, तर त्याला ५०% पार्टनरशिप द्यावीच का? कोणत्याही पार्टनरशिपमध्ये काही ठळक मुद्दे जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते.
१) कार्यक्षमता : व्यवसायात एखादा पार्टनर किती वेळ देऊन काम करू शकतो. त्यानुसारच त्याला पार्टनरशिपमध्ये हिस्सा द्यावा.
२) व्यवसाय म्हणजे नोकरी नव्हे : व्यावसायिकांवर प्रचंड दबाव असतो. प्रत्येक पार्टनरमध्ये हा दबाव झेलण्याची पात्रता असावी, व्यावसायिक प्रेशर झेलण्याच्या क्षमतेनुसारच पार्टनरशिपमधील वाटा निश्चित करावा.
३) गुंतवणूक : दोन्ही पार्टनर्सनी व्यवसायात किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे हा सुध्दा महत्वाचा मुद्दा आहे.
४) कौशल्य : पार्टनरशिपमध्ये हा एक महत्वाचा घटक आहे. समजा एखाद्या पार्टनरकडे ऑफिस मॅनेजमेंटचे कौशल्य असेल व दुसऱ्याकडे मार्केटिंग कौशल्य असेल यामध्ये मार्केटिंगची जबाबदारी मोठी असते. त्यावरच व्यवसायाचे यश अवलंबून असते. त्यासाठी खूप मेहनत, वेळ द्यावा लागतो. अशावेळी दोन्ही पार्टनर्सनी सामंजस्याने संवाद साधून मार्केटिंगची बाजू सांभाळणाऱ्या पार्टनरला अधिक हिस्सा (अंदाजे ७५%) देण्याबाबत एकमत करावे. सोप्या शब्दांत सांगायचे तर ज्याचे जसे कौशल्य व जबाबदारी त्यानुसारच पार्टनरशीपमध्ये किती हिस्सा घ्यावा हे निश्चित करावे.
यासाठी उचित, अनुभवी सल्लागारांशी बोलून त्याच्यासोबत किमान ३ ते ४ वेळा मिटींग घेऊन सखोल चर्चेअंतीच पार्टनरशिपबद्दल योग्य निर्णय घ्यावा. तसे न केल्यास व्यवसायात नंतर गंभीर वाद निर्माण होऊ शकतात व त्याचा वाईट परिणाम थेट व्यवसायांवर होऊ शकतो.
”If your business partners aren’t working as hard as you, it’s not a partnership it’s a sinking ship…”
नवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके विकत घेण्यासाठीhttp://bit.ly/nabooks
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन
Copyright © 2020 Navi Arthkranti