महत्त्व: मी एक व्यवसाय सल्लागार आहे व या क्षेत्रात गेली १० वर्षे कार्यरत आहे. मला अनेक व्यावसायिक व नवव्यावसायिक व्यवसाय मार्गदर्शनासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी भेट देत असतात किंवा अन्य पध्दतीने संपर्क साधत असतात. त्यापैकी सर्वाधिक क्लाईंट हे पार्टनरशीपमध्ये वाद होणे, त्यामुळे व्यवसाय ठप्प होणे, कलह होणे या समस्या घेऊन येतात. अशी दरवर्षी किमान २५-३० प्रकरणे माझ्याजवळ सल्ला घेण्यासाठी येतात. त्यामध्ये दोन्ही पार्टनर्स येतात, कधी कधी त्यांचे कुटुंबीयही येतात. सर्वसाधारणपणे पार्टनर्समध्ये भांडणं होणे, पार्टनरशीपमध्ये वाद निर्माण होणे, त्यामुळे व्यवसाय तोट्यात जाणे, एका पार्टनरकडून दुसर्या पार्टनरची फसगत होणे असे भयंकर प्रकार मार्केटमध्ये होत आहेत. त्यामुळे कोणत्याही पार्टनर सोबत व्यवसाय सुरू करताना अगदी डोळ्यांत तेल घालून पार्टनरशीप डीड करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. या गोष्टीचे महत्त्व सुरुवातीच्या काळातच जाणून न घेतल्यास भविष्यात अत्यंत वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यातून नुकसान तर होतेच, पण संबधही खराब होतात, कमालीची कटुता येते. भांडणे, मारामार्याही होतात. प्रसंगी खूनसुध्दा पाडले जातात. पार्टनरशीपच्या वादात खून झाल्याच्या अनेक बातम्या पाहायला, वाचायला मिळतात.
जबाबदारी: पार्टनरशीप डीडमधील सर्वात महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे जबाबदारी. एखाद्या व्यवसायात २ किंवा अधिक पार्टनर्स असतील तर कुणावर कोणती जबाबदारी असेल हे नमूद करावे लागते. कुणी मार्केटमध्ये कुशल आहे तर त्याच्यावर मार्केटिंगची जबाबदारी, कुणी फायनान्स संबधी कुशल असेल तर त्याच्यावर तर फायनाशियल गोष्टींची जबाबदारी, कुणी दुकान/फॅक्टरी चालवण्यात तरबेज असेल, तर त्याला ती जबाबदारी निश्चितपणे नमूद करणे आवश्यक आहे.
फायदा-तोटा विभागणी: पार्टनरशिपमध्ये व्यवसायात फायदा झाल्यास त्यामध्ये कोणास किती टक्के फायदा होणार, तसेच तोटा झाल्यास तो सहन करण्याची कुणाची किती क्षमता आहे, तो कोण सहन करणार हे स्पष्टपणे पार्टनरशिपमध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
एक्झिट: जसे नोकरी करणार्या व्यक्तीस जेव्हा नोकरी सोडावी असे वाटते किंवा त्याला कामात त्रास होतो असे वाटते, त्यावेळी ती व्यक्ती सरळ राजीनामा देऊन त्या कंपनीतून बाहेर पडते. व्यवसायातही पार्टनरकडून आपली फसवणूक होत असेल किंवा एखाद्या पार्टनरला इतर संधी मिळत असतील किंवा आरोग्यविषयक प्रश्न असतील किंवा कौटुंबिक समस्या असतील, तर अशा कुठल्याही समस्येमुळे व्यवसायातून बाहेर पडायचे असेल, तर पार्टनरशीप डीडमध्ये एक्झिटचा मुद्दा स्पष्टपणे नमूद केला पाहिजे.
फायदा: पार्टनरशिप डीडमध्ये ज्या कायदेशीर बाबी आहेत. उदा. ट्रेडमार्क नोंदणी करणे, तसेच तुमच्या कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली, तुमच्या कंपनीकडून काही बेकायदेशीर गोष्टी घडल्या, अपघात झाला, एखादा पार्टनर निवृत्त झाला किंवा मयत झाला आणि मयत पार्टनरच्या नंतर कंपनीतील मालकीचा उत्तराधिकारी कोण होणार अशा सर्व कायदेशीर बाबी पार्टशिप डीडमध्ये नमूद कराव्यात.
कुटुंबातील डीड: कौटुंबिक व्यवसायात अशी काही पार्टनरशीप डीड नसते असे दिसते. घरातील सदस्य एकत्र मिळून व्यवसाय करतात. त्यामध्ये नेमकं कोणी काय काम करावे, कोणती जबाबदारी पार पाडावी हे निश्चित केलेले नसते. मग जर त्यात वाद झाल्यास गोंधळ व कौटुंबिक कलह निर्माण होतात. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायातही पार्टनरशिप डीड केली पाहिजे. जेणेकरून प्रत्येकाची कामे व जबाबदार्या उत्तमरित्या पार पडतील.
अल्ट्रा एज्युकेशनचे संस्थापक आणि सीईओ ज्युलियन हॉल यांच्या मते, “If your business partners aren’t working as hard as you, its not a partnership it’s a sinking ship”
काही मदत हवी आहे का? : तुम्ही एखादा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये करू इच्छिता किंवा सध्या पार्टनरशिप डीड मध्ये काही संभ्रम आहेत का? आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा, अधिक माहिती देऊ. खालील क्रमांकावर कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा.
कॉल: 9082724164व्हॉट्सॲप: 8082188307
– प्रकाश भोसले
नवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके विकत घेण्यासाठीhttp://bit.ly/nabooks
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन
Copyright © 2020 Navi Arthkranti