एक विवाहिता, जिला स्वतःची दोन मुलं आणि मृत सवतीच्या चार मुली होत्या. नवरा कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करणारा एक साधा मजूर. मोठे कुटुंब तशा गरजाही मोठ्या, पण पगार मात्र छोटा. गरजा काही पूर्ण होत नव्हत्या. मग तिने कंबर कसली आणि स्वतःच्या संसाराची गाडी रुळावर आणली. तिने एक असा काही पराक्रम केला की, ती आशियातील पहिलीच महिला ठरली. चला तर मग जाणून घेऊ, आजच्या भागात, त्या महिलेबद्दल आणि तिच्या पराक्रमाबद्दल.
भारतातील कोट्यावधी तरुणांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक असलेल्या कन्याकुमारीत १७ एप्रिल १९५९ रोजी तिचा जन्म झाला. ती अगदी लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला. म्हणून तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. वयाच्या १४व्या वर्षी ती चारचाकी वाहन चालवायला शिकली. बालपण तसे हलाखीतच गेले आणि तरुण झाल्यावर वयाच्या १९ व्या वर्षी तिला बापाने एका ४ मुली असलेल्या विधुराच्या गळ्यात मारली. लग्नानंतर हिला २ मुलं झाली. कुटुंबाचा पसारा वाढला होता. पण, मजूर असलेल्या नवऱ्याच्या पगाराचा विस्तार काही होत नव्हता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. काय करावे असा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला होता.
संकट म्हणजे संधी. तिच्यासाठी देखील संधीच. कारण घर चालविण्यासाठी तिला घरातून बाहेर पडावे लागले. एका संस्थेत ती सचिव म्हणून काम करू लागली. घरातून बाहेर पडल्याने तिच्या प्रगतीला सुरुवात झाली.
तामिळनाडू परिवहन मंडळाने बस चालक पदासाठी जाहिरात दिली. तिला चारचाकी वाहन चालविता यायचे. नोकरीत महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवल्या होत्या. त्यामुळे तिने यासाठी अर्ज केला. कित्येक दिवस तिला मुलाखतीसाठी बोलावणेच आले नाही. पण ती आशावादी होती. तिने प्रयत्न सुरु केले. तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. पण महिलांना चालक म्हणून नोकरीत घेण्यास शासन आणि प्रशासन दोन्हीही निरुत्साही होते. “या जगात खूपच कमी महिला, चालक म्हणून काम करता आहेत. आपण पुरुषांबरोबर काम करू शकाल क?” असा प्रश्न तेथील अधिकाऱ्यांने तिला विचारला. पण तिचा निर्धार पक्का होता. आपल्यावर उठलेल्या या प्रश्नाला पुढे तिने कृतीतूनच उत्तर दिले. जेव्हा ती बस ड्रायव्हरच्या परीक्षेसाठी पोचली तेव्हा लोक तिच्यावर हसू लागली. पण जेव्हा तिने सगळ्या टेस्ट पास केल्या तेव्हा तेथील अधिकारीही आश्चर्यचकित झाले. तिच्या या निर्धारापुढे प्रशासनाला झुकावे लागले. १९९३ साली वयाच्या ३४व्या वर्षी तिला नोकरी द्यावीच लागली. ती आता पहिली महिला बस चालक बनली, केवळ भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली महिला बसचालक. ती फर्स्ट लेडी म्हणजेच वसंतकुमारी.
जिथे आजही महिलांची वाईट ड्रायव्हिंगसाठी खिल्ली उडवली जाते. अशा समाजात १९९३ सालापासून एक बस ड्रायव्हर म्हणून एम. वसंतकुमारी काम करत आहेत. वसंतकुमारी यांनी गाडीचं स्टेअरिंग त्या काळात सांभाळलं आहे, ज्या काळात महिला एकट्याने प्रवास करताना घाबरायच्या. आपल्या तान्हुल्यांना सोडून कधी त्या सकाळी ६च्या शिफ्ट ला जायच्या, तर कधी रात्री १० वाजता घरी यायच्या. ट्राफिकरुपी संकटांवर मात करत, त्या आपल्या संसाराचा गाडा चालविण्यात यशस्वी झाल्या. त्यांचा आत्मविश्वास एव्हढा मजबूत होता की, त्यांच्या स्वप्नांच्या गाडीचा ब्रेकडाऊन कधी झालाच नाही. घरचे आत्यंतिक दारिद्र्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, महिला म्हणून असणाऱ्या मर्यादा, पुरुषांच्या बरोबरीने काम, वेळेत आणि कामात कसलीही सूट नाही, कोणतीही सहानभूती नाही, या सर्वांवर मात करून, महिलांनी परिस्थितीशी झगडून सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रेरणा असणाऱ्या वसंतकुमारी एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतासह. तो पर्यंत धन्यवाद!!!
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti