भारतीय क्रिकेट संघाच्या टीशर्टवर जे नाव दिसते BYJU ते साधेसुधे नाव नाहीय. या कंपनीच्या मालकाने दस्तुरखुद्द उद्योगपती आनंद महिंद्रा आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांनाही मागे टाकले आहे.
‘फोर्ब्स’ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये एकेकाळी ट्युशन्स घेणार्या एका शिक्षकाचाही समावेश केला आहे. ‘फोर्ब्स’नुसार त्याची सध्याची संपत्ती २.९ अब्ज डॉलर्स (२० हजार कोटी रुपये) इतकी आहे. एका शिक्षकाकडे असलेली इतकी संपत्ती वाचून कदाचित आपणांस आश्चर्य वाटत असेल. पण ती संपत्ती मिळविण्यामागे संघर्षही मोठाच आहे. कोण हा शिक्षक? काय आहे त्याचा संघर्ष? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग…
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील अझिकोड या ठिकाणी एका शिक्षक दांपत्याच्या पोटी १९८१ साली त्याचा त्याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण अझिकोड येथील मल्याळम माध्यमिक शाळेत झाले, जिथे त्याचे आईवडील शिक्षक होते. घरच्या शैक्षणिक वातावरणामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार झाले. त्यामुळेच त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला.
सुट्टीच्या निमित्ताने काही दिवस तो बेंगलोर ला गेला. तेथे त्याचे काही मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. त्या मित्रांना त्याने गणित विषयासाठी मार्गदर्शन केले. त्याचे ते सर्वच मित्र त्या परीक्षेत यशस्वी झाले. त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरू करण्याविषयी आग्रह धरला. मित्रांच्या आग्रहाचा त्याने सकारात्मक विचार केला. नोकरी सोडली आणि आपले संपूर्ण लक्ष ट्युशनवर केंद्रित केले. त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. त्याचा क्लास छोट्याशा खोलीतून हॉलमध्ये गेला, हॉल मधून ऑडीटोरियममध्ये आणि तेथून थेट स्टेडियममध्ये गेला. एकाच वेळी तब्बल २५००० विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली, इतका तो प्रसिद्ध झाला.
प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याने पैसा, वेळ आणि श्रम तिन्हींचा अपव्यय होऊ लागला. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल असे साधन निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक ऑनलाईन शिकवणी घेणारी Think and Learn Private Ltd. ही कंपनी सुरू केली. त्याच्या माध्यमातून एक वेबसाईट सुरू केली. त्यावर अनेक व्हिडिओ अपलोड केले. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ लागला. ती साईटही लोकप्रिय झाली. मग त्याने एक ॲप तयार केले. या ॲपच्या माध्यमातून ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्याना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण, अगदी घरबसल्या मिळू लागले. अल्पावधीतच या ॲपने पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित केलेच, शिवाय अनेक गुंतवणूकदारांचे ही लक्ष आकर्षित केले. आणि या ॲपनेच त्याला यशाच्या शिखरावर पोहचविले. ते ॲप म्हणजेच BYJU’s आणि त्याचा संस्थापक म्हणजेच बायजू रविंद्रन होय.
BYJU’s ही भारतातील नव्हे, तर जगातील सर्वोत्तम एडटेक कंपनी आहे. एका खोलीत सुरू झालेल्या ट्युशनचा पसारा साऱ्या जगभर पसरला आहे. यासाठी बायजू रविंद्रन यांचे कष्ट, कामावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत. या ॲपच्या माध्यमातून त्यांनी लोकांना शिक्षणाकडे नव्या पद्धतीने बघायला शिकवले. ह्या ॲपचा वापर करून आपण घरबसल्या आँनलाईन अभ्यास करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे याची आपल्याला कोणतीही फी आकारली जात नाही. फक्त काही मोजक्याच कोर्सेससाठी फी आकारली जाते.
लाखो विध्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा सर्व विध्यार्थ्यांना एकत्र शिकवता आले तर आणि त्यांनी २०१५मध्ये BYJU’S द लर्निंग ॲप लाँच केले. यानंतर या ॲपच्या सबस्क्रायबरची संख्या वेगाने वाढू लागली. सध्या बायजूचे ११.५ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. फॉर्च्युन मासिकाने सप्टेंबर २०२० मध्ये ग्लोबल 40-अंडर-40 टेक्नॉलॉजी लिस्टमध्ये बायजू रविंद्रनचा देखील समावेश केला होता. रवींद्रन यांच्या पत्नी दिव्या गोकूळनाथ या कंपनीच्या सह-संस्थापिका आहेत. त्या रवींद्रन यांच्या सुरवातीच्या विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. ‘बायजूज्’च्या गुंतवणूकदारांमध्ये मार्क झुकेरबर्ग आणि ‘टेंन्सेंट’, ‘सोफिना’ आदींचा समावेश आहे. बायजू हे आशियातील एकमेव स्टार्टअप आहे ज्यास मार्क झुकेरबर्गने ५ कोटी रुपये इतका निधी दिला आहे.
प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्वोत्तम गुणाची जाण असणे फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट अतिशय सोपी करून सांगणे. हा सर्वोत्तम गुण बायजू यांच्याकडे होता. त्याचा त्यांना शोध लागला. त्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले. आज भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत बायजू रविंद्रन यांचा समावेश आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://naviarthkranti.org/
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti