वेळेची बचत आणि सुखदायी प्रवासामुळे नागरिक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. प्रवाशांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी विमान कंपन्यांत स्पर्धा लागलेली असून त्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जात असतात. त्याचबरोबर विमान कंपन्यांची प्रतिष्ठा राखण्याची महत्त्वाची जबाबदारी विमान कर्मचार्यांवर असते. पायलट असो की, हवाई सुंदरी किंवा फ्लाईट इंजिनिअर यांच्या सेवेवरच विमान कंपन्यांचा दर्जा अवलंबून असतो. चांगली सेवा मिळाल्यास प्रवासीही विशिष्ट कंपन्यांच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. म्हणूनच विमान कंपन्याही चांगल्या कर्मचार्यांच्या भरतीसाठी प्रयत्नशील असते.
पायलट : पायलट अर्थात वैमानिक हे रोमांचक आणि कौतुकास्पद करिअर आहे. एअरलाईनच्या वैमानिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. कौशल्यपूर्ण उड्डाणाची क्षमता राखणार्या भावी वैमानिकांना हेलिकॉप्टर तसेच विमान उडविण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. व्यावसायिक वैमानिक हा केवळ विमानाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवत नाही; तर अडचणीच्या किंवा आणीबाणीच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता बाळगून असतो. वैमानिकाला विमानातील सहकारी, प्रवासी यांच्याशी सुसंवाद ठेऊन काम करावे लागते. विमानाची वेळ पाळण्याचे बंधनही वैमानिकावर असल्याने सर्वांशी मेळ साधून त्याला आपले काम पार पाडावे लागते. हवामानाचा अभ्यास, उड्डाणाचे वेळापत्रक, विमानातील इंधनची स्थिती, जड सामानाचे एकूण वजन याबात त्याला दक्ष राहवे लागते. विमानातील स्वयंचलित यंत्रामुळे सर्व कार्य बिनदिक्कत पार पाडले जाते. परंतु, त्यावर वैमानिकाला बारकाईने लक्ष ठेवावे लागते.
फ्लाईट इंजिनिअर : विमानातील कार्यपद्धतीवर लक्ष ठेवणार्या आणि नियंत्रण करणार्या यंत्रणेवर देखरेख करण्याचे काम व्यावसायिक फ्लाईट इंजिनिअरवर असते. तो विमानातील तांत्रिकबाबींना जबाबदार धरला जातो. फिक्स्ड विंग, रोटरी विंग, स्पेस फ्लाईट या पद्धतीची त्याला तपासणी करावी लागते. विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी इंजिनची तपासणी करणे, इंजिनमध्ये बिघाड असल्यास तत्काळ वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देणे आदी जबाबदार्या त्याला पाहव्या लागतात. विमानाची देखभाल करणे आणि विमानाची संपूर्ण तांत्रिक माहिती चांगली अवगत असणे गरजेचे आहे.
परस्युअर: अत्याधुनिक विमान कंपन्यांतमध्ये कॅबिन मॅनेजर म्हणजेच चिफ फ्लाईट अटेंडसला ‘परस्युअर’ या नावाने ओळखले जाते. विमानातील प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षिततेची जबाबदारी यावर सोपविलेली असते. विमानात प्रवास करताना प्रवाशांना आरामदायी वाटते की नाही, याची चाचपणी त्याला करावी लागते. प्रत्येक प्रवाशांच्या स्थितीबाबत त्याला लक्ष ठेऊन त्यासंदर्भातील पूर्तता त्याला करावी लागते.
फ्लाईट अटेंडस : विमानातील प्रवाशांना व्यक्तीश: सेवा देणार्याला फ्लाईट अटेंडस असे म्हणतात. विमान प्रवाशांच्या अडचणी जाणून घेणे आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे प्रमुख काम फ्लाईट अटेंडसचे असते. त्याला विविध भाषाही अवगत असाव्यात, अशी प्राथमिक अपेक्षा एअरलाईन्स कंपन्या बाळगून असतात. परदेशासाठी उड्डाण करणार्या विमानात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना त्या त्या देशातील भाषा येणे गरजेचे असून जेणेकरून प्रवाशांची अधिक संवाद स्पष्टपणे होऊ शकेल, हा त्यामागचा उद्देश आहे.तसेच देशातर्गंत उड्डाणात दक्षिण, पूर्वेकडील राज्याची भाषा येणे कधी कधी अनिवार्य ठरते. तो कमालीचा संयमी असावा असे सांगितले जाते. प्रवाशांनी तक्रार केल्यास त्याची सोडवणूक शांतपणे करणे, हे प्लाईट अंटेडसचे कर्तव्य मानले जाते. अर्थात प्रत्येक प्रवाशांला फ्लाईट अटेंडसची गरज असेल असे नाही. फ्लाईट अटेंडस हा सकारात्मक विचार करणारा असावा आणि चेहर्यावर नेहमी आनंदीवृत्ती दिसण्याची काळजी त्याला घ्यावी लागते. आत्मविश्वासाने भरलेला फ्लाईट अटेंडस हा स्वभावाने लवचिक, मृदू भाषेत बोलणारा, प्रेमळपणाने प्रश्नाची सोडवणूक करणारा असावा, असे सांगितले जाते. कधी कधी प्रवाशांला खिडकीजवळ बसल्याने त्रास होतो, अशा प्रवाशास पर्यायी जागेवर बसविणे आणि अन्य प्रवाशास त्याजागी आणण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते.
विमानातील वयस्कर प्रवाशांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अशा वेळी फ्लाईट अटेंडसने त्यांची आस्थेवाईपणे चौकशी करावी, असे एअरलाईन कंपन्या अपेक्षा ठेवतात. एकंदरित विमान क्षेत्रात करिअरला उत्तम संधी आणि वाव असून विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी याचा विचार करायला हरकत नाही.– सर्वेश्वर पिंगळे
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti