ऑक्टोबर महिन्यातील २९ तारीख ही ‘जागतिक इंटरनेट दिन’ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात १९९५च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं असलं, तरी त्यापूर्वी कित्येक दशके अमेरिकेत (आणि काही युरोपियन देशांमध्येही) त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. आज भारतासह संपूर्ण जग ज्या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन’ मानतं, तो दिवस आहे २९ ऑक्टोबर १९६९ हा. सुमारे ४४ वर्षांपूर्वीचं हे १९६९ वर्ष विज्ञानाच्या दृष्टीनं एकूणच क्रांतिकारी होतं. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच वर्षी पुढे सुमारे ३ महिन्यांनी २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच या २९ ऑक्टोबर तारखेला ‘जागतिक इंटरनेट दिन’ मानलं गेलं आहे.
प्रत्यक्ष १९६९च्या २९ ऑक्टोबरला जो प्रसंग घडला, तो मोठा मनोरंजक आहे. १९६0च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी व्यवस्था गुप्त संदेशवहनासाठी हवी होती. त्यादृष्टीनं अमेरिकन संरक्षण खात्यानं अर्पानेट नावाच्या एका संशोधन प्रकल्पाला मोठं अर्थसाह्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठांमध्ये जोडण्यात आलेले होते. खरं तर त्या चार संगणकांचं ते जगातलं पहिलं इंटरनेट होतं. या चार संगणकांपैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, तर दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात. तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. १९६९चे ते संगणक अर्थातच आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर हिरव्यार्जद अक्षरांनी चमकणारे असत.
त्या पार्श्वभूमीवर २९ ऑक्टोबरला कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या चार्ली क्लाईन (वय २१) या तरुण पदवीधर विद्यार्थ्यानं स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागाला फोन लावला. पलीकडच्या लाईनवर स्टॅनफोर्डचा बिल डुवाल हा तरुण होता. चार्लीनं फोनवर सांगितलं, की ‘मी आता माझ्या इथल्या संगणकावर काही टाइप करणार आहे. तुझ्याकडे तो संदेश येतोय का पाहा?’ इकडे स्टॅनफोर्डचा बिल डुवाल तो संदेश प्राप्त करण्यास उत्सुक होता. दोघंही एकीकडे एकमेकांशी फोनवर बोलत होते, तर दुसरीकडे त्यांचे डोळे आपापल्या संगणकांच्या मॉनिटरवर एकाग्र झाले होते. इकडे चार्लीनं L अक्षर टाइप केलं. फोनवर तो बिलला म्हणाला, ‘अरे मी एल टाइप केला आहे. बघ तुझ्याकडे आला का ते?’ बिल फोनवर उत्तरला, की ‘हो, आला इकडे एल’. चार्लीनं नंतर O अक्षर टाइप केलं. ‘मी ओ टाईप केला आहे’ तो फोनवर बिलला म्हणाला. ‘हो, ओ अक्षरपण आलं आहे,’ बिलनं प्रतिसाद दिला. ‘बरं मी आता G आणि I टाइप करतोय.’ चार्ली एवढं म्हणतोय न म्हणतोय तोच बिल ओरडला ‘थांब थांब, माझा कॉम्प्युटर क्रॅश झाला आहे.’ कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या चार्लीला लॉगिन (LOGIN) हा शब्द स्टॅनफोर्डच्या बिलला पाठवायचा होता. त्यासाठी ही सारी यातायात चालली होती. मात्र, इंटरनेटवर जगात जो पहिला संदेश पाठवला गेला, त्यात दोनच अक्षरं होती L आणि O. नंतर तासाभरानं तो क्रॅश संगणक ठीक झाल्यानंतर चार्ली आणि बिल डुवाल यांच्यात लॉगिन हा संपूर्ण शब्द आणि अन्य संदेश पाठवण्यात यश आले. असा तो २९ ऑक्टोबर १९६९चा प्रसंग. अमेरिकन विद्यापीठं, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती, हाही त्यातून आपल्यासाठी निघणारा एक बोध.
अशा प्रकारे ४४ वर्षांपूर्वी दोन तरुणांनी इंटरनेटवरचा पहिला संदेश ‘LO’ पाठवला. तेव्हा २१ वर्षांचा असणारा चार्ली क्लाईन आता ६५ वर्षांचा आहे. मोबाईलवर इंटरनेट वापरणार्या आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं चार्ली आणि बिल गेल्या पिढीतले आहेत; पण त्या पिढीनं पुढल्या पिढीसाठी ‘LO’ यशस्वी केल्यानंतरच हे शब्द आज सहजपणे जगभर फिरताहेत.
अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गोष्टींमधल्या कोणत्याही तीन निवडा, असा प्रश्न जर आजच्या तरुण पिढीला केला, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनपैकी ते कोणता गाळतील, हे सांगणं अवघड आहे. एक नक्की, की कोणत्याही परिस्थितीत ते इंटरनेट वगळणार नाहीत. कारण त्यांचा प्रत्येक श्वास आज प्राणवायूपेक्षा इंटरनेटच्या साह्यानं चालतो आहे. इंटरनेट वापरताना त्रास दिला म्हणून आईला मारणार्या मुलांच्या बातम्या आपण ऐकतो आहोत किंवा नको ते फोटो फेसबुकवर अपलोड केले म्हणून आत्महत्या करणारी मुलगी बातमीचा विषय होताना आज दिसते आहे. अशा स्थितीत इंटरनेटकडे कसं पाहायला हवं? आपण एखाद्या ट्रककडे ज्या पद्धतीनं पाहतो तसंच इंटरनेटकडे पाहायला हवं. एखाद्या भरधाव जाणार्या ट्रकखाली एखादा मुलगा येतो आणि त्या अपघातात तो मृत्युमुखी पडतो. असे हजारो अपघात रोजच घडत असतात. पण, म्हणून कुणी ट्रक वापरायचा नाही असं म्हणू शकत नाही. कारण, ट्रक नसेल तर जीवनावश्यक वस्तूंचं इकडून तिकडे होणारं वहन कसं होईल? इंटरनेटचंही तसंच आहे. त्याची जीवनावश्यकता एव्हाना जगाने ओळखली आहे. एक दिवस असा येणार आहे, की संपूर्ण पृथ्वी ही मोफत वाय फायने युक्त असेल. एव्हरेस्टसारख्या एखाद्या उंच ठिकाणी कदाचित प्राणवायू मिळणार नाही; पण वाय फायचा सिग्नल खात्रीपूर्वक मिळताना दिसेल. आज ते अतिरंजित वाटले, तरी नजीकच्या भविष्यकाळात ते होणार, हे निश्चित आहे.
आजची तरुण पिढी संपर्कासाठी इंटरनेटचा वापर अफाट करीत असते. व्हॉट्सअॅपसारखं अॅप्लिकेशन हे त्याचं उदाहरण. फेसबुकवर आज जितकी सुखदु:खं व्यक्त होतात, तेवढी समक्ष भेटीतही होत नाहीत, हे आजचं सत्य आहे. तरुण पिढी आज अशा एका वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’मधून जात आहे. २४ तासांपैकी ९0 टक्के वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रिनवर रोखले गेलेले दिसतात. स्क्रीनवर रोखले गेलेले डोळे बाजूला करून त्यांनी आजूबाजूच्या वेगवान जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं आवश्यक आहे.
आजच्या तरुण पिढीसमोर प्रचंड ज्ञान, संपर्काचं प्रचंड सुख, छायाचित्र, संगीत, ध्वनी, चलचित्रपट वगैरेंनी उदंड भरलेलं चविष्ट ताट इंटरनेटनं ठेवलं आहे. बसल्या जागी मोबाईलमधून ते मिळत आहे. तरुण पिढीनं काळजी घ्यायची आहे ती आपल्या प्रकृतीची. कारण अपचनातून उद्भवणार्या विकारांना अन्नाचं भरलेलं ताट जबाबदार नसतं; चूक अति खाणार्याची असते, हे लक्षात घ्यायला हवं. ‘जागतिक इंटरनेट दिना’चा हा संदेश जगातील तरुण केव्हा मनापासून स्वीकारतील, हाच आजचा खरा प्रश्न आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
Copyright © 2020 Navi Arthkranti