आज उद्योग जगतातील आयर्न लेडी मल्लिका श्रीनिवासन यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म. १९ नोव्हेंबर १९५९ रोजी अल्वलकुरुची तिरूवेलीनल्ली, तमिळनाडू येथे झाला. मल्लिका श्रीनिवासन या जगातील तिसऱ्या व देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर निर्माता कंपनी ‘ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड अर्थात ‘टाफे’च्या (TAFE) चेअरमन आहेत. मल्लिका श्रीनिवासन यांना देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत फोर्ब्सने 58 वे स्थान दिले आहे. भारतीय महिलांमध्ये त्या पाचव्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची संपत्ती 17917 कोटी रुपये आहे. ‘फोर्ब्स’ने मल्लिका श्रीनिवासन यांचा प्रभावशाली महिला म्हणूनही गौरव केला आहे.
मल्लिका श्रीनिवासन यांचे वडील हे ख्यातनाम उद्योगपती होते. त्या लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण Wharton School of Business, USA इथून पूर्ण केले. मल्लिका श्रीनिवासन यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलीने भाषेचा अभ्यास करावा. पण मल्लिकांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी व्यवस्थापन शास्त्रातल्या अभ्यासासाठी व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवला होता. त्या वेळेस त्या एका मुलीची आई होत्या पण आईपण त्यांचं शिक्षण रोखू शकलं नाही. भारतात परत आल्यावर आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी टाफेमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम काम करण्यास सुरुवात केली. आपले वडील उद्योगपती असल्याने आपल्याला गलेगठ्ठ पगार, मोठी केबिन मिळेल असं मल्लिका श्रीनिवासन ह्यांना वाटतं होतं, प्रत्यक्षात मात्र त्यांना एक छोटी केबिन आणि अतिशय कमी पगारावर कंपनीमध्ये घेतलं गेलं. ह्यामुळे नाराज झालेल्या मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी आपल्या वडिलांना म्हटलं की माझ्या सोबतच्या व्हार्टन बिझनेस स्कूल मधल्या अनेकांना खूप मोठा पगार आहे. त्यावर शांतपणे त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘Listen young lady, you might be an MBA from Wharton, but I don’t need one to run the company.’ ह्या उत्तरानंतर मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी कंपनीत वाटचाल केली ती स्वबळावर. त्यानंतर मल्लिका श्रीनिवासन टाफेमध्ये एक-एक पायऱ्या वर चढत गेल्या. टाफेच्या Chief Executive Officer बनल्यावर त्यांनी कंपनीत आमूलाग्र बदल केले. अनेक कटू निर्णय त्यांना घ्यावे लागले त्यासाठी टिकाही सहन करायला लागली. एक स्त्री म्हणून जरी वडिलोपार्जित व्यवसाय असला तरी कंपनीची दिशा ठरवताना त्यांना अनेक अडचणी आल्या पण सगळ्यावर मात करून त्यांनी काही धीट निर्णयही घेतले. त्यापैकी एक म्हणजे २००५ ला आयशर मोटर्सच्या ट्रॅक्टर बिझनेसवर मिळवलेला ताबा.
त्याकाळी ट्रॅक्टर क्षेत्र अतिशय मंदीचा सामना करत होतं. अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनात कपात केली होती. अशा कठीण काळात आपलं उत्पादन क्षेत्र वाढवण्याचा मल्लिका श्रीनिवासन ह्यांचा निर्णय उद्योग जगतात डोळे विस्फारून गेला. कारण मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी घेतलेली ही खूप मोठी रिस्क होती. काही वर्षाने ह्याच निर्णयाने टाफेला भारतातील ट्रॅक्टर क्षेत्राचा २५% हिस्सा गाठून दिला. टाफे ही महिंद्रा अँड महिंद्रा नंतर ट्रॅक्टर उत्पादन करणारी भारतातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली. ट्रॅक्टर क्षेत्रात होणाऱ्या वाढीच्या दुप्पट वेगाने टाफे वाढत होती. मासे फर्ग्युसन (Massey Ferguson), आयशर, आयएमटी हे ट्रॅक्टर ब्रँड त्यांनी निर्माण केले. टाफेने मल्लिका श्रीनिवासन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपलं क्षेत्र ट्रॅक्टरपुरती मर्यादित न ठेवता शेतीसाठी लागणाऱ्या अन्य उत्पादनावर वळवलं. ज्यात हार्वेस्टर्स, बॅटरी, इंजिन्स, इंजिनिअरिंग प्लास्टिक, हायड्रॉलिक्स पंप, पॅनल इंस्ट्रुमेंटेशन अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा समावेश आहे. टाफेच्या ह्या सर्वांगीण प्रगतीमागे मल्लिका श्रीनिवासन ह्यांची दूरदृष्टी कारणीभूत होती. मंदीच्या काळात मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी कंपनीच्या खर्चात प्रचंड कपात केली. पण त्याचवेळी त्यांनी कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटला हात लावला नाही. ह्याचा फायदा टाफेला प्रचंड झाला. जेव्हा ट्रॅक्टर क्षेत्रातील मंदी ओसरली तेव्हा टाफे अनेक नवीन उत्पादन घेऊन बाजारात उतरलं. ह्या नवीन उत्पादनांच्या वेगवेगळ्या रेंजमुळे टाफेच्या विक्रीत कमालीची वाढ नोंदवली गेली.
वेगवेगळ्या वस्तूंसाठी मल्लिका श्रिनिवासन ह्यांनी दोन स्तरीय योजना आखल्या होत्या. एकतर निर्माण होणारी नवीन वस्तू प्रभावी खर्चात (cost effective) असली पाहिजे. दुसरं म्हणजे ती शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी असली पाहिजे. ह्यासाठी अनेकदा मल्लिका श्रीनिवासन गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत, एखाद्या टपरीवर थांबून चहा पित कुठे काय कमी पडते आहे ह्याचा आढावा तिथल्या शेतकऱ्यांकडून घेत असत. ह्या अनुभवांचा सरळ फायदा टाफेला आपली उत्पादनं निर्माण करण्यात झाला. त्यामुळेच त्यांच्या उत्पादनांनी नुसत्या भारतात नाही तर विदेशात अतिशय कमी वेळात लोकप्रियता मिळवली.
उद्योग क्षेत्रात टाफे समूहाचं नाव जगभरात पोहचवताना मल्लिका श्रीनिवासन समाजाच्या प्रती असलेलं कर्तव्यही विसरल्या नाहीत. शंकरा नेत्रालय सारख्या संस्थेच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. दक्षिण भारतातील अनेक कॅन्सर हॉस्पिटल, शालेय संस्था तसेच हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांनी भरीव योगदान दिलं आहे. ह्या सोबत कर्नाटकी संगीतासाठी ही त्यांनी काम केलं आहे. मल्लिका श्रीनिवासन ह्या भारतातील मोस्ट पॉवरफुल बिझनेस वुमन्स मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत, तर आशियामध्ये पहिल्या ५० स्त्रियांमध्ये त्यांच नावं समाविष्ट आहे. त्यांच्या उद्योग जगतातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
एका छोट्या उद्योग समूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतं त्या रोपट्याचं वृक्षात रूपांतर करून त्याची पायमुळं जगातील १०० देशांत रोवताना मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी त्याचसोबत एक आई, एक मुलगी, एक पत्नी अशा सगळ्याच भूमिका समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारा तर आहेच, पण त्याचसोबत स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने यशस्वी होऊ शकते व समर्थपणे उद्योग सांभाळू शकते हा संदेश पूर्ण जगाला दिला आहे. त्यांचे पती वेणू श्रीनिवासन हे टी.व्ही.एस (TVS) मोटार्समध्ये चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन
Copyright © 2020 Navi Arthkranti