लायबेरियातील एका आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या एका सर्वसामान्य महिलेचा, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदापर्यंतच्या संघर्षमय प्रवासाची ही प्रेरणादायी कथा…
२९ ऑक्टोबर १९३८ रोजी एलेनचा जन्म एका आदिवासी कुटुंबात झाला. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी विवाह झाला. परंतु हा विवाह फार काळ टिकला नाही. आपले कुटुंब चालविण्यासाठी एलेन आपल्या पतीसोबत नोकरी करायची. एलेन अतिशय बुद्धिमान होती. त्यामुळे तिने आपले शिक्षण सुरू ठेवत, हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली.
एलेनच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे तिची नियुक्ती लायबेरियाच्या अर्थमंत्रीपदी करण्यात आली. तिने दहा वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. १९८०मध्ये सैमुअल डो नावाच्या एका सैन्य अधिकाऱ्याने, लायबेरियाचे राष्ट्रपती टॉल्बर्ट यांची हत्या केली आणि देशाची सत्ता हस्तगत करून आपली हुकूमशाही प्रस्थापित केली. त्यामुळे एलेनसह अनेक नेत्यांना देश सोडावा लागला. त्यानंतर तिने वर्ल्ड बँक, सिटी बँकेत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
देशात अशांतता आणि अराजकता माजली. अनेक नेत्यांचे खून करण्यात आले. देशाला एकदा नव्हे तर दोन वेळा गृहयुद्धाला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. देशाची जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली. हुकूमशाही राजवटीची झळ देशातील प्रत्येकाला सोसावी लागली. पंचवीस वर्ष देशाला आणि देशातील लोकांना नरकयातना सहन कराव्या लागल्या.
एलेन देशात परत आली. लायबेरियातील नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, सन्मानाची वागणूक मिळावी, देशात शांतता नांदावी, लोकशाही प्रस्थापित व्हावी. यासाठी एलेन तब्बल पंचवीस वर्ष लढा देत राहिली. १९८५ व १९९७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये तिने प्रयत्न केले. परंतु तत्कालीन हुकूमशाही सत्तेमुळे आणि अपारदर्शक निवडणुकीमुळे तिला यश आले नाही. सरकारवर केलेल्या टीकेमुळे तिला अटक करून १० वर्षांची कैद सुनावण्यात आली. मात्र नंतर तिला सोडून देण्यात आले. पराभूत झाल्यावरसुद्धा तिने आपली जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. प्रदीर्घ लढ्यानंतर २००५ साली झालेल्या पहिल्या लोकशाही निवडणुकीत एलेन विजयी झाली आणि ती लायबेरियाची आणि आफ्रिका खंडातीलसुद्धा पहिली महिला राष्ट्रपती बनली. ती महिला म्हणजेच एलेन जॉनसन सरलीफ होय.
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी चिकाटी फार महत्वाची आहे. त्यासाठी वेळ देणे, संयम राखणे, परिश्रम करणे या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. देशाला अराजकतेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या आयुष्याची तब्बल पंचवीस वर्ष एलेन यांनी खर्च केलेली आहेत. मोठं यश मिळविण्यासाठी संघर्ष देखील मोठाच करावा लागतो. २००५ नंतर २०११ साली सुद्धा त्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या.
लायबेरियातील नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार, सन्मानाची वागणूक मिळावी, देशात शांतता नांदावी, लोकशाही प्रस्थापित व्हावी. यासाठी एलेन यांनी शांतीपूर्ण मार्गाने प्रचंड प्रयत्न केले. जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. फोर्ब्सच्या २०१४ आणि २०१६च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. शांततेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना २०११ साली शांततेचे नोबेल पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने २०१३ साली इंदिरा गांधी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद!!!
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://www.naviarthkranti.org
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti