आपले मार्कभाऊ झुकेरबर्ग म्हणजे निव्वळ किडेबाज माणूस! या भावाला हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना ‘फेसमॅश’ नावाची कल्पना सुचली. फेसमॅश म्हणजे अशी साईट जिथे एकमेकांच्या थोबाडांची तुलना करून सर्वात भारी कोण (Who is hotter?) निवडायचे. हैत का नै मार्कचे किडे? अर्थात, जगातील कुठल्याही विद्यापीठाचे संचालक खडूस असतात या नियमाला हार्वर्ड पण अपवाद नसल्याने मार्क भावाचे हे किडे तिथल्या संचालकांनी लगेच ठेचून टाकले. ही साईट बंद कर नाहीतर हाकलून देऊ अशी धमकी मिळाल्यावर फेसमॅश बंद झाले.पण गप्प बसतोय तो मार्क कसला? त्यातल्या त्यात बरी संकल्पना म्हणून TheFacebook घेऊन आला. हार्वर्डच्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, कोण काय ऍक्टिव्हिटी करतंय ते बघता यावं असा बेसिक हेतू यामागे होता. ही साईट मात्र लोकप्रिय झाली. बघता बघता हार्वर्ड विद्यापीठाच्या बाहेर सुद्धा लोकप्रियता मिळाली आणि मार्कभाऊने आजच्याच दिवशी, म्हणजे 4 फेब्रुवारी 2004 रोजी द फेसबुक नावाची कंपनीच स्थापन केली! पुढच्या वर्षी म्हणजे 2005 मध्ये कंपनीने नावातून द हा शब्द काढून टाकला आणि फक्त ‘फेसबुक’ एवढेच नाव ठेवले.
हे प्रवास वाटतो तितका सोपा झाला नव्हता बरं का… फेसबुकची पहिली चार वर्षे भांडण करण्यातच गेली. कारण हार्वर्डच्या तीन सिनिअर विद्यार्थ्यांनी मार्कवर दावा केला की मूळ संकल्पना आमची असून मार्कने आम्हाला फसवले आहे. एकत्र मिळून काम करू असे सांगून संकल्पना चोरून स्वतः वापरतो आहे. पुढे त्यांचा दावा खरा ठरला आणि मार्क भाऊला भरभक्कम भरपाई तसेच फेसबुकमधील शेअर्स त्या तिघांना द्यावे लागले.
मग मात्र फेसबुकने मागे वळून पाहिले नाही… एका छोट्याश्या जागेत प्रत्येकी एक एक हजार डॉलर गुंतवून मार्क आणि त्याचा पार्टनर एडवर्ड यांनी सुरू केलेले फेसबुक आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकप्रिय साईट बनले आहे. पहिला नंबर अर्थातच गुगलचा. दुसऱ्या क्रमांकावर थोड्या फरकाने युट्युब आहे. फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते कोणत्या देशात आहेत माहीत आहे? ते आहेत भारतात! दोन नंबरला अमेरिका, तिसऱ्या नंबरवर इंडोनेशिया, चौथ्यावर ब्राझील आणि पाचवा नंबर मेक्सिकोचा लागतो.
एक गमतीची गोष्ट अशी की, फेसबुक वापरणाऱ्यांपैकी निम्म्या लोकांची मुख्य भाषा इंग्लिश नाही. दुसरी गंमत अशी की, 98% लोक फेसबुक मोबाईलवरच वापरतात. फेसबुकवर अकाउंट उघडलेले चार पैकी तिघे जण रोज एकदातरी फेसबुकवर चक्कर मारून जातात. जगातील 83% व्यावसायिक फेसबुकवर आपला व्यवसाय थाटून बसले आहेत.
फेसबुक लोकप्रिय होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याने स्वतःमध्ये वेळोवेळी केलेले बदल. वापरकर्त्यांना काय हवंय हे फेसबुकने अचूक ओळखलं आणि त्यांना आवडेल अश्या सुधारणा स्वतःमध्ये केल्या. वापरकर्त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जेणेकरून ते दुसऱ्या सोशल नेटवर्किंग साईटवर जाण्याचा विचार करणार नाहीत. अर्थात, सोशल मीडियाच्या जगात एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचे आरोप फेसबुकवर होत असतात आणि काही अंशी ते खरेही आहेत. एखादा प्लॅटफॉर्म लोकप्रिय होत असेल तर वाट्टेल ती किंमत मोजून तो विकत घेण्याचा अट्टाहास करणे मार्क भाऊंची खासियत आहे. उदाहरणार्थ : इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप. आणि आता तर भाऊ ‘मेटा’ द्वारे जग मुठीत घेऊ पाहतोय. अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार हे संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकते. चीनने तर आधीच स्वतःच्या सोशल मीडिया साईट्स सुरू करून परदेशी साईट्सवर बंदी घातलीय.
पण ते काही असो, आज फेसबुकचा वाढदिवस आहे तर आपण साजरा करायलाच हवा. आफ्टरऑल, याच्यामुळेच तर आपण एकमेकांना ओळखतो. कोण कुठला दादा आणि परदेशातली एखादी ताई यांची फेसबुकवर ओळख होते काय आणि ते आयुष्यभरासाठी भावाबहिणीच्या नात्याने जोडले जातात काय… चार गावातील चार जण फेसबुकवर जोडले जाऊन एखादा ग्रुप स्थापन करतात काय आणि त्यातून उपक्रम घेतात काय… कुठे पूर आला तर लांब लांबची लोकं फेसबुकवरून प्रत्यक्षात एकत्र येऊन मदत करतात काय… कुणी नैराश्यातून आत्महत्या करायला निघतो आणि फेसबुकवरून सूत्रे हलवून त्याला ताबडतोब गाठून आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले जाते काय… अशक्य अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फेसबुकमुळे शक्य झाल्या आहेत! अनोळखी लोकांसमोर आपली कला सादर करून कौतुक मिळवणे इथेच शक्य होते. कुणाच्या भावनिक गरजा सुद्धा इथे पूर्ण होतात. मनातलं बोलायला जवळ कुणी नसणं ही भावना भयानक आहे, पण फेसबुक तुमच्या एका मेसेज वर माणूस उपलब्ध करून देतं. एखाद्या नव व्यावसायिकाला, एखाद्या डबघाईला आलेल्या विक्रेत्याला फेसबुक पैसे मिळवून देतं. इथे रेसिपी शेअर केल्या जातात, इथे झाडांची काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं जातं, इथे लग्नही जुळवली जातात! सुख दुःख वाटून घेण्यासाठी सुद्धा फेसबुक आपल्या सेवेत चोवीस तास हजर आहे. किती गुण वर्णावे या फेसबुकचे?
म्हणून बड्डे हाय फेसबुकचा… जल्लोष हाय जगाचा!
अनुप कुलकर्णी
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti