नोकरी करायची की व्यवसाय ह्या प्रश्नाला केवळ भांडवल नाही म्हणून नोकरीचा निर्णय घेणारे कित्येक तरुण मी पाहिले आहेत. कितीतरी ठिकाणी poll (मतदान) घेतल्यानंतर मिळालेले उत्तर जाणून घेतले. मराठी उद्योजकाला व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी समस्या कोणती? हा प्रश्न विचारला असता एका ठिकाणी मिळालेल्या मतदानाची आकडेवारी देत आहे. भांडवल नसणे(३६६ मते), मार्गदर्शन नसणे(२१३ मते), कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा नसणे(१२७ मते) मार्केटिंग न करता येणे(९३ मते), मानसिकता व यशाबाबत साशंकता(५५ मते), सरकारी अडथळे(४१ मते), चुकीचे निर्णय(२८ मते). म्हणजेच भांडवल नसणे ही समस्या सर्वाधिक उद्योजकांना जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लगेच तुम्हाला हवे तेवढे भांडवल मिळाले तर काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याचा बिझनेस प्लान बनविलेला आहे का? त्या व्यवसायासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही तयार आहात का? त्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? तुमच्याकडे या प्रश्नाची उत्तरे असली तर लगेच तुम्हाला भांडवलदार उपलब्ध आहेत. नसतील तर आपण त्याची तयारी करुन घेऊ.
भांडवल उभारणीचे काही पर्याय :
बँका – बँकेसाठी सर्वात महत्त्वाची माणसे असतात ती म्हणजे कर्जदार. ठेवीदारापेक्षा बँकांना कर्जदाराची गरज जास्त असते. कारण बँका चालवण्यासाठी लागणारा पैसा हा कर्जदाराकडून मिळालेल्या व्याजातूनच मिळत असतो. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी उद्योजकांचा शोध घेत असतात. मात्र त्यांना कर्जाची रक्कम व व्याज योग्य वेळी आपण परत करु शकतो. या गोष्टीची खात्री पटवून देणे गरजेचे असते. एकदा आपण बँकेला कर्ज फेडण्याची खात्री पटवून देऊ शकलो की बँक आपल्याला लागेल तेवढे कर्ज उपलब्ध करुन देते. आपणही आपला व्यवसाय अधिक जोमाने वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती पार पाडणे व्यवसायाची वेगवान वृध्दीची गुरुकिल्ली प्राप्त करु शकतो.
HNI & NRI – एचएनआय म्हणजे High Networth Individual. भरपूर संपत्ती कमावलेली काही माणसे आपल्या समाजात असतात. त्यांना आपले पैसे काही नवीन व्यवसाय करणाऱ्या होतकरु तरुणांना मदत म्हणून द्यायचे असतात. यापैकी काही एचएनआय हे भागीदारी (Partnership) मागतात तर काही लोकांना खात्रीशीर (fixed return) पैसे परत हवे असतात. ह्या लोकांपर्यंत आपली व्यवसायाची संकल्पना पोहोचवणे गरजेचे असते. अशा लोकांचे संपर्क क्रमांक, इमेल असल्यास त्यांना आपला बिझनेस प्लॅन पाठवावा. व नंतर त्यांना आपण बिझनेस प्लॅन पाठवल्याची व त्यांना तो पोहोचला असल्याची खात्री करुन घ्यावी. भारताबाहेर राहणारे अनिवासी भारतीय म्हणजेच NRI (Non Resident Indian) या लोकांकडे बऱ्यापैकी पैसे असतात. त्यांना भारताविषयी आस्था असते. ती व्यक्त करण्यासाठी व त्यातून ते गुंतवणूक करण्यास तयार करतात. मिळकत ही रिटायरमेन्ट साठी वापरता यावेत म्हणून जमा करुन ठेवतात. म्हणून हे पैसे दीर्घ कालावधीसाठी वापरता येतात. फक्त प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराचे पैसे इमानेइतबारे परत करावेत. कारण आपल्याला वेळोवेळी व्यवसायवाढीसाठी लागणारे पैसे ते देऊ करतात. त्यामुळे वेळच्यावेळी परत पैसे दिल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो.
👍 Crowd Funding – आजूबाजूच्या सामान्य माणसांकडून कमी प्रमाणात व जास्तीत जास्त लोकांकडून पैसा उभा करुन मोठे भांडवल उभा करता येते. ५०० लोकांकडून १००० रुपये प्रत्येकी एक वर्षासाठी कर्जाऊ घेतल्यास ५ लाख रुपये सहज उभा करता येतात. आपला प्रस्ताव हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बल्क एसएमएस, सोशल मिडीया व बल्क इमेल या माध्यमातून आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवू शकतो.
उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी आगाऊ नोंदणी करणे हाही एक भांडवलनिर्मितीचा मार्ग आहे. काही वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीने ५०० रुपयात मोबाईल देण्याची घोषणा करुन आगाऊ नोंदणी (Advance Booking) करुन लाखो रुपयांचे भांडवल उभा केले होते व नंतर काही महिन्यांनी ग्राहकांना मोबाईल दिले. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे थेट परकीय गुंतवणूक हाही भांडवलनिर्मितीचा पर्याय उपलब्ध आहे. आपण जेवढी अधिक कल्पकता वापरु तेवढे अधिक पर्याय आपण स्वतःच निर्माण करु शकतो. व हवे तेवढे भांडवल उभे करता येते. त्यासाठी अतिशय उत्तम असा बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार असायला हवा.
— अमोल चंद्रकांत कदम
नवी अर्थक्रांतीच्या पुस्तकांची डिजिटल कॉपी विकत घेण्यासाठी http://bit.ly/nabooks
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti