भारतीय गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून सरकारने चौथी एव्हरेस्ट शिखर मोहीम आखली होती. या मोहिमेत १६ सदस्य होते पैकी ५ महिला. चार टप्प्यात एव्हरेस्ट चढाई करायची होती. मोहीम सुरू झाली. जसजसे शिखर जवळ येऊ लागले तसतसे एक एक सदस्य माघारी परतु लागले. जेव्हा टीम तिसऱ्या टप्प्यात पोहचली, तेव्हा चार महिलांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला. एका महिलेचा अजून निर्णय व्हायचा होता. तिने कोणता निर्णय घेतला? काय घडले असेल पुढे? ती महिला कोण? जाणून घेऊ आजच्या भागात.
उत्तराखंड राज्यात, हिमालयाच्या कुशीत २४ मे १९५४ रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातील नकुरी या गावी एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी तिने गिर्यारोहणाला सुरुवात केली. त्याकाळी मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जायचे, मुलींनी केवळ चूल आणि मुल इतकाच काय तो विचार केला पाहिजे अशी स्थिती होती. पण तरीही तिच्या घरच्यांनी तिला शिकवले. तिने एम.ए.बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ती शिक्षिका बनली, पण तिने ती नोकरी सोडली.
तिला स्वतःला सिद्ध करण्याची एक वेगळी वाट मिळाली. ती वाट होती गिर्यारोहणाची! नोकरी सोडल्यावर तिने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केला. तिचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. पण दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली. तिने हा अभ्यासक्रम उत्तमप्रकारे पूर्ण केला. यामुळेच तिची निवड भारतीय गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून सरकारने आखलेल्या चौथ्या महिला आणि पुरूष या संयुक्त एव्हरेस्ट शिखर मोहिमेत झाली.
मोहीम सुरू झाली, पण जसजसे शिखर जवळ येत होते, हवामानात तीव्र बदल होऊ लागला तसतसे एक एक सदस्य माघारी परतू लागले होते. जेव्हा टीम तिसऱ्या टप्प्यात पोहचली, तेव्हा पाचपैकी चार महिलांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला. कारणही तसेच होते. कडाक्याची थंडी, श्वास घेताना येणारा अडथळा, जखमी झालेले सहकारी आणि ढासळत चाललेला आत्मविश्वास.
तिलाही या सर्वाचा त्रास झालाच पण तिने निर्णय घेतला. पुढे जाण्याचा. कारण तिचा आत्मविश्वास. तिला विश्वास होता शिखर गाठण्याचा आणि तिने ते गाठलेच. उणे चाळीस तापमान, ताशी शंभर किमी वेगाने वाहणारे थंड वारे तसेच होणारा प्रचंड हिमवर्षाव या सगळ्यांवर मात करीत जगातील सर्वोच्च असणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर तिने काबीज केले. आणि त्या सागरमाथ्यावर तिरंगा ध्वज फडकावला. असा पराक्रम करणारी ती जगातली फक्त पाचवी महिला होती आणि भारताची पहिली महिला, अर्थात बचेंद्री पाल. २३ मे १९८४ रोजी बचेंद्री पाल यांनी जगातील सर्वोच्च शिखर एवरेस्ट (८८४८ मी.) सर केले.
ज्या समस्या इतरांना होत्या, त्याच बचेंद्री पाल यांनादेखील होत्या. आपल्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे बचेंद्री पाल मागे फिरल्या असत्या तर त्या आज कोठे असत्या? त्या चार महिलांच्या यादीत त्यांचाही समावेश झाला असता आणि बचेंद्री पाल हे नाव आज कोणालाही माहित. बचेंद्री पाल यांच्या कार्याची दखल घेत १९८६ मध्ये त्यांना खेळातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांच्या या अतुलनीय पराक्रमासाठी भारत सरकारने त्यांना १९८४ साली पद्मश्री आणि २०१९ साली पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
इथे शिव खेरा यांचे एक वाक्य जाणीवपूर्वक लिहावेसे वाटते. ते म्हणतात, “विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.” जसे की, बचेंद्री पाल यांनी केले. म्हणूनच त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आणि म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.
उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतासह. तो पर्यंत धन्यवाद!!!
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
Home Page
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti