जगातील सर्वांत मोठे मोबाईल डाटा नेटवर्क असलेल्या रिलायन्स जिओने अखेर जिओ गिगाफायबरच्या सेवेची घोषणा केली आहे. भारतातील सुमारे १६०० शहरांमध्ये जिओ फायबरच्या माध्यमातून ही होम सर्व्हिस दिली जाणार आहे.
सध्या भारतात स्थिर जोडणी ब्रॉडबँडचा सरासरी वेग २५ एमबीपीएस (मेगा बाइट प्रति सेकंद) आहे. अमेरिकेत हा वेग ९० एमबीपीएस आहे. भारतातील १०० टक्के पूर्ण फायबर ब्रॉडबँड सेवा १०० एमबीपीएस वेगाने सुरू होत आहेत. ती भविष्यात १ जीबीपीएसपर्यंतही जाईल. यामुळे जगातील आघाडीच्या पाच ब्रॉडबँड देशांमध्ये भारत स्थान मिळवेल.
जिओ गिाफायबर प्लॅनचे भाडे ६९९ रुपयांपासून ८,४९९ रुपयांपर्यंत आहे. किमान भाड्याचा प्लॅन असलेल्या ग्राहकांनाही १०० एमबीपीएस वेग मिळेल. ग्राहकांना १ जीबीपीएसपर्यंत वेग मिळणार आहे. सर्वांना किफायतशीर दरात सेवा मिळावी यासाठी अनेक प्लॅन आणण्यात येणार आहेत. जिओच्या प्लॅनचे भाडे जागतिक दरांच्या एकदशांशापेक्षा कमी किमतीचे आहेत.
६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय-काय मिळणारजिओच्या सुरुवातीचा प्लॅन हे ब्रॉन्झ आहे. यामध्ये ग्राहकाला १०० एमबीपीएस पर्यंत वेग मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (१०० जीबी+५० जीबी अतिरिक्त) मिळेल. या प्लॅनमध्ये मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना भारतात कोणत्याही क्रमांकावर कॉल करता येईल.
८४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय-काय मिळणार८४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित डेट (२०० जीबी+२०० जीबी अतिरिक्त) मिळेल. प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना भारतात कोणत्याही क्रमांकावर कॉल करता येईल.
१२९९ रुपयांचा प्लॅनमध्ये मिळेल मोफत टीव्हीजिओच्या १२९९ रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना २५० एमबीपीएसची स्पीड मिळेल. प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित (५०० जीबी+ २५० जीबी अतिरिक्त) डेटा मिळेल. ग्राहकांना या प्लॅनमध्ये मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 4K स्मार्ट टीव्ही सेट मिळेल.
२४९९ रुपयांच्या प्लॅनची माहितीरिलायन्स जिओच्या २४९९ रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा (१२५० जीबी + २५० जीबी अतिरिक्त) मिळेल. ग्राहकाला या प्लॅनमध्ये मोफत व्हाईस कॉलिंगचाही फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकाला लँडलाईन फोनने देशात कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल. २४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २४ इंचाचा एचडी टीव्ही मिळेल.
३९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबीपीएसचा स्पीडरिलयान्सच जिओच्या ३९९९ रुपयांच्या प्लॅटिनम प्लॅनमध्ये ग्राहकाला एक जीबीपीएस स्पीड मिळेल. प्लॅनमध्ये ग्राहकाला अमर्यादित डेटा (२५०० जीबी) मिळेल. या प्लॅनमध्येही व्हाईस कॉलिंगचाही फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकाला लँडलाईन फोनने देशात कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल. या प्लॅनमध्ये ३२ इंचाचा एचडी टीव्ही मिळेल.
८४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४३ इंचाचा टीव्हीजिओच्या ८४९९ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये ग्राहकाला १ जीबीपीएसचा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकाला ४३ इंचाचा 4K टीव्ही मिळेल. या टीव्हीची किंमत ४४९९० रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला एका महिन्यात ५००० जीबी डेटा मिळेल.
जिओ फायबर केबल टी.व्ही
जिओ फायबर कनेक्शनबरोबर टी.व्ही सर्व्हिस घेण्यासाठी ग्राहकांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. ही सर्व्हिस फक्त डीटीएचच्या माध्यमातूनच मिळणार आहे. केबल सर्व्हिससाठी जिओ मोफत सेट-टॉप बॉक्स देखील मिळणार आहे. या सेट-टॉप बॉक्समध्ये अनेक फिचर असून त्यात व्हिडिओ कॉलिंगसोबत मिक्स रिऍलिटी सर्व्हिस मिळणार आहे.
फ्री- व्हॉइस कॉल
जिओ होम फोनमध्ये कंपनी ब्रॉडबँड कनेक्शनसोबतच लँडलाइन सेवा देण्यात येत आहे. या सेवेमुळं ग्राहक देशभरात फ्री व्हॉइस कॉल करू शकणार आहेत. तसंच कमी दरात आंतरराष्ट्रीय फोन करू शकणार आहेत.
अशी करावी नोंदणी – जिओ गिगा फायबरसाठी नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. ज्या ग्राहकांना या ब्रॉडबँड सर्व्हिसची बुकिंग करायची असेल, ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट jio.com किंवा My Jio App हून करू शकतात. जर जिओ फायबरची सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध असेल तर जिओचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti