₹150.00
उद्योग आणि मराठी माणूस
मराठी उद्योजकाला उद्योग/व्यवसाय हा शब्द ऐकल्यावरच एक प्रकारची भीती मनात वाटते. एखादी मराठी व्यक्ती व्यवसायात उतरते तेव्हा तिला सर्वत्र विरोध समस्या आणि अडचणी यांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर व्यवसाय सुरु झाला की तो कसा करावा? उद्योग करताना सल्ला कोणाचा घ्यावा? जर अपयश आले तर ते पचवून पुढे कसे जायचे? भांडवल कसे उभे करावे? आपण उद्योगामध्ये कमी कुठे पडतो? असे अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात. या आणि अशाच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहेत.
लेखक – प्रा. प्रकाश भोसले नवी अर्थक्रांती प्रकाशन पाने – १६८ किंमत – १५० रु.
There are no reviews yet.
Your email address will not be published. Required fields are marked *
Your review *
Name *
Email *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
Copyright © 2020 Navi Arthkranti