म्हटलं जातं की, जगात अशक्य अस काहीच नाही. बस, करण्याची इच्छा आणि चिकाटी असावी लागते. देवाने प्रत्येक माणसाला खास बनवलं आहे आणि त्याला एकसारखाच मेंदू दिला आहे. बस काही लोक त्याचा योग्य वापर करून यशस्वी होतात तर काही त्याचा वापर न करता मजुरी सारखे छोटे काम करत राहतात. प्रत्येक माणसाने मोठे स्वप्न बघितले पाहिजे कारण मोठे स्वप्न बघूनच माणूस काहीतरी करू शकतो. अनेक लोकांचे अभ्यासात मन लागत नाही अशा लोकांकडे काही गोष्टी खास असतात. मग तो एकटिंग मध्ये हुशार असू शकतो, क्रिकेटमध्ये किंवा अन्य दुसऱ्या प्रोफेशन मध्ये उत्तम असतो.
शाळेत नापास पण जगभरातील ५०० हून अधिक कंपन्यांना आपल्या इशार्यावर चालवू शकणाऱ्या त्रिशनित अरोरा या २७ वर्षीय युवकाची कहाणी मोठी रोचक म्हणावी लागेल. त्रिशनित हा एथिकल हॅकर म्हणून काम करतो आणि त्याच्या टॅक (TAC) सिक्युरिटी सोल्युशन्स कंपनीचा व्यवसाय आज करोडो रूपयांचा आहे. त्रिशनितने हे यश अवघ्या २२व्या वर्षातच मिळविले आहे.
एथिकल हॅकिंग म्हणजे नेटवर्क, सिस्टीम इन्फ्रास्ट्रकचरची सुरक्षा इव्हॅल्युएट करणे. म्हणजे कोणत्याही कंपनीची, संस्थेची सायबर सुरक्षा भेदली जाऊ नये यावर हे हॅकर्स लक्ष ठेवतात तसेच डेटा चोरी, व्हायरस घुसविणे अशा प्रकारांपासूनही संरक्षण देतात. त्रिशनित भारतीय गुप्तचर संस्था सीबीआय, रिलायन्स, अमूल, पंजाब पोलिस, गुजरात पोलिस, अव्हॉन सायकल्स यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांना ही सेवा त्याच्या टॅक सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून देतो आहे. त्रिशनितला पहिल्यापासून संगणकात खूपच स्वारस्य होते व त्या पायी शाळेत आठवीत असताना हॅकिंगच्या नादात त्याने दोन पेपर दिले नाहीत परिणामी त्याच्यावर आठवी नापासचा शिक्का बसला. त्याचे वडील अकाऊटंट. मुलाचे हे उद्योग त्यांना व परिवाराला कधीच आवडले नाहीत. मात्र त्रिशनित हेच आपले करियर करायचे यावर ठाम होता.
आठवीत नापास झाल्यावर त्याचे मित्रही त्याची चेष्टा करू लागले तेव्हा त्याने शाळा सोडली व बाहेरून बारावीची परीक्षा दिली. एकीकडे एथिकल हॅकिंग सुरू होतेच. वयाच्या २०व्या वर्षी तो कॉम्प्युटर फिशिंग आणि सॉफ्टवेअर क्लीनिंगचे छोटे काम घ्यायला लागला. यातून त्याने पहिल्या महिन्यात जवळपास ६० हजार रुपये कमावले. हा पैसा त्याने कंपनीच्या कामात लावला आणि २१व्या वर्षी TAC नामक एक सायबर सिक्युरिटी कंपनी उभी केली. ही कंपनी नेटवर्किंगला सुरक्षित ठेवण्याचे काम करते. अवघ्या दोन वर्षात त्याच्या कंपनीकडे ५०० हून अधिक ग्राहक आले.
द हॅकिंग एरा, हॅकिंग वुईथ स्मार्टफोन्स व हॅकिंग टॉक त्रिशनित अरोरा ही त्याची पुस्तकेही तुफान लोकप्रिय ठरली आहेत. आंत्रप्रिन्युर ऑफ द ईयर (२०२०), २०१९ साली फॉर्च्यूनच्या भारतातील 40 Under 40च्या यादीत समावेश, २०१८ साली फोर्ब्सच्या 30 Under 30च्या यादीत समावेश असे अनेक मानसन्मान त्याला मिळाले आहेत. पंजाब सरकारने त्याचा २०१४ ला खास सन्मान केलाच पण २६ जानेवारी २०१५ला त्याला पंजाब आयकॉन म्हणूनही गौरविले आहे.
आजमितीस त्याच्या कंपनीची भारतात चार, तर दुबईत एक कार्यालय आहे. सुमारे ४०% ग्राहक याच कार्यालयातून व्यवहार करतात. जगभरात ५० फॉर्च्युन आणि ५०० कंपन्या त्याचे ग्राहक आहेत. त्रिशनित आता त्याचा व्यवसाय यूएसमध्ये सुरू करण्याच्या प्रयत्नात असून व्यवसायाची उलाढाल १ अब्ज डॉलर्सवर नेण्याची आशा बाळगून आहे.
मित्रांनो तर आयुष्यातील कोणतीही वाईट गोष्ट वाईट आहे असे न बघता तिच्याकडे सकारात्मक मार्गाने बघितले पाहिजे. कारण आयुष्यातील सर्वात मोठा लॉस हा आलेले अपयश नसते. लेख आवडल्यास शेअर नक्की करा.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
आर्थिक क्षेत्रातील काही बदल सुधारणा
थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड विशेष लेख – असा खेळाडू पुन्हा होणे नाही
१२७. जीवनात, उद्योगात यशस्वी व्हायचं असेल तर गरुड व्हा
Copyright © 2020 Navi Arthkranti