सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात जन्माला आलेल्या आणि केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या एका तरुणाने हजारो कोटींची, आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली कंपनी निर्माण करून ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. कोण हा तरुण? काय त्याचा संघर्ष? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग…
१ नोव्हेंबर १९६६ रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी आईवडिलांनी थेट पुणे गाठलं. वडील फिलिप्स कंपनीत हेल्पर, तर आई घरकाम करायची. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब पुण्यातील नरवीर तानाजीवाडीमध्ये एका छोट्याशा खोलीत राहायचं. आपल्या मुलांनी उत्तम असे शिक्षण घ्यावं ही वडिलांची इच्छा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही, त्यांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. पुस्तके, फी यासाठी पैसे लागायचे. त्यासाठी वडील घरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्तीचे काम करायचे. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच त्याने रेडिओ दुरुस्त करायला सुरुवात केली होती.
तो रडत खडत दहावीपर्यंत पोहचला. कसेबसे दहावीचे शिक्षण पूर्ण करून त्याने शिक्षणाला कायमचा रामराम ठोकून वडिलांना कामात मदत करायला सुरुवात केली. निकालाची वाट न बघता एका कॅल्क्युलेटर दुरुस्त करणाऱ्या कंपनीत त्याने नोकरी मिळवली. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं सोबत बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फॅसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या. थोड्याच दिवसात नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचे दुकान देखील सुरू केले. आता तो बऱ्यापैकी पैसे मिळवू लागला होता. एक दिवस एका बँकेमध्ये प्रिंटर दुरुस्ती करण्यासाठी गेला असता, त्याला टीव्ही सारखी एक वस्तू दिसली. त्याचे कुतूहल जागृत झाले. त्याला कोणीतरी सांगितले की, “याला संगणक म्हणतात आणि येणारे युग हे संगणक युग आहे.” तो नव्वदच्या दशकाचा काळ होता. त्यावेळी भारतात संगणकाने चंचुप्रवेश केला होता. त्याला भविष्यात होऊ घातलेल्या बदलाची चाहूल लागली.
आपल्या धाकट्या भावाला, संजयला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊन दिला आणि स्वतः मोठ्या जिद्दीने संगणक दुरुस्त करण्याचे तंत्र आत्मसात केले. संजय देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता. काही दिवसातच पुण्यामध्ये संगणक हार्डवेअर दुरुस्तीच्या क्षेत्रात त्याचा दबदबा निर्माण झाला. भारतात इंटरनेटच्या प्रवेशासोबत, संगणकात व्हायरसने शिरकाव केला. संगणक नादुरुस्त होऊ लागले. एक नवे आव्हान, एका नव्या संधीच्या रूपाने त्याच्या समोर उभे राहिले. व्हायरसने संगणक नादुरुस्त होऊ नये यासाठी अँटी व्हायरसचा वापर व्हायचा. या अँटी व्हायरसने आपण पैसे कमावू शकतो याची जाणीव त्याला झाली. आपल्या भावाच्या मदतीने त्याने स्वतःच अँटी व्हायरस तयार करायचे ठरविले. तब्बल दीड वर्षे प्रयत्न करून एका देशी अँटी व्हायरसचा जन्म झाला. एक नवी कंपनी स्थापन केली. अथक परिश्रम करून आपले उत्पादन विकले आणि कंपनी नावारूपास आली. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या कंपनीने आपले स्थान भक्कम केले. ती कंपनी म्हणजेच क्विक हिल आणि तिचे संस्थापक म्हणजेच कैलास काटकर होय.
कैलास काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. आपली टीम उभी केली. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धा असूनही क्विकहिल मोठी झाली. छोट्याशा खोलीतून सुरु होऊन एक लाख स्क्वेअर फुटच्या ऑफिसमध्ये रुपांतरित झाली. आज क्विकहिलमध्ये १५००च्या वर कर्मचारी काम करतात. तर ऐंशीहून अधिक देशात कंपीचे अँटीव्हायरस विकले जातात. आणि हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं.
कैलासजींचा हा प्रवास अतिशय खडतर आहे. तीव्र स्पर्धा, आर्थिक चणचण, नवे उत्पादन, अनेक नावाजलेल्या परदेशी कंपन्या या व यासारख्या असंख्य समस्यांना ते पुरून उरले आहेत. तीव्र बुद्धी, खडतर परिश्रम, ऊर्जा, चिकाटी, नाविन्याची ओढ, भविष्याची जाण यासारख्या अनेक गुणांसोबतच गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या जोरावर त्यांनी ११२ हून अधिक देशात आपल्या कंपनीचे जाळे निर्माण केले आहे.
कैलाशजींच्या या प्रवासात ना कुटुंबाची आर्थिक स्थिती आड आली, ना शिक्षण. केवळ त्यांचं कर्तृत्वच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेलं आहे. पुण्यातील एका चाळीतील एका लहानशा खोलीत सुरू झालेल्या या कंपनीचा प्रवास एक नावाजलेला ब्रँड बनून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि भक्कम स्थान निर्माण करण्यात कैलाश काटकर यशस्वी झाले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://naviarthkranti.org/
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti