‘कायद्याचे शिक्षण घे’ असा घरच्यांचा दबाव त्या तरुणावर होता. पण त्याला सुरुवातीपासूनच व्यवसायात उतरायचं होतं. कायद्याची प्रॅक्टिस करायची का उद्योग सुरु करायचा असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. त्याने कशाची निवड केली असेल? त्याला काय संघर्ष करावा लागला? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग…
१९२५ साली गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुआ नावाच्या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण गावातच घेऊन पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला. ‘कायद्याचे शिक्षण घ्यावे.’ असा घरच्यांचा दबाव त्याच्यावर होता. परंतु, त्याला सुरुवातीपासूनच उदयोजक व्हायचे होते. त्याने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पण ‘वकिली करायचीच नाही’ असा ठाम निर्धार केला. त्याच्या या निर्णयाला घरच्यांनी विरोधच केला, पण तो जुमानला नाही.
मुंबईमध्ये एका डाईंग व प्रिंटिंग प्रेसमध्ये त्याने कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. कालांतराने एका लाकडाच्या व्यापाऱ्याकडे शिपाई म्हणूनही काम केले. शिपायाच्या नोकरीतून काही भागत नव्हते. सततच्या आर्थिक तंगीमुळे त्याच व्यापाऱ्याच्या गोदामात आपल्या पत्नीबरोबर राहण्याची वेळ आली. अनेक समस्या या कालावधीत त्याच्या समोर उभ्या ठाकल्या, पण तो निर्धाराने सामोरा गेला. व्यवसायाची त्याला प्रचंड आवड होती. त्याच्या डोक्यात सतत व्यवसायाच्या अनेक कल्पना असायच्या. याच हुशारीवर मोहन नावाच्या एका गुंतवणूकदाराने पैसे लावले. सुरुवातीला पश्चिमी देशांतून सायकल, सुपारी अशा वस्तूंची आयात-निर्यात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या आयात निर्यात व्यवसायात चांगला जम बसला.
सुतारकाम करणाऱ्या कारागिरांना लाकूड जोडताना प्राण्यांच्या चरबीचा ‘गोंद’ वापरताना, बरेच कष्ट घ्यावे लागायचे. या जोडकामासाठी घट्ट स्वरूपातील गोंद पातळ करण्यासाठी उकळावं लागे. त्याच्या घाणेरड्या वासाचा त्रास व्हायचा हे सारं तो पाहत असे. या समस्येत त्याला संधी दिसली. सिंथेटिक रसायने वापरून, सहजासहजी वापरता येणारा गोंद तयार करता येईल का यावर त्याने संशोधन सुरू केले आणि त्याला या समस्येवर उपाय सापडला. हा उपाय सुतारांना तर आवडलाच, शिवाय भारतातही तो लोकप्रिय ठरला. तो लोकप्रिय उपाय म्हणजेच फेविकॉल आणि त्याचा निर्माता म्हणजेच ‘फेविकॉल मॅन बळवंत पारेख’ होय.
बळवंत पारेख यांनी त्यांचा भाऊ सुनील पारेख यांच्यासह १९५४ मध्ये मुंबईतील जेकब सर्कलमध्ये Parekh Dyechem Industries दुकान सुरु केले. इथेच त्यांनी टेक्सटाईल प्रिंटिंगसाठी लागणारे रंगांशी संबंधीत रसायन बनविण्यास सुरुवात केली. भारतात त्यावेळी अधेसिव्ह मार्केट बऱ्यापैकी विस्कटलेले होते. पारेख यांनी हे बरोबर हेरले आणि व्यवसायात उडी घेतली. १९५९ मध्ये त्यांनी पिडिलाईट इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्यावेळी भारतात प्राण्यांच्या चरिबीपासून गोंद बनवले जाई. पारेख यांनी फेविकॉल नावाने पांढऱ्या रंगाचे ग्लू (गोंद) बनवायला सुरुवात केली. फेविकॉलमुळे सुतारांचा भरपूर वेळ वाचत तर होताच त्याचबरोबर वापरायला पण सोपे होते. फेविकॉल ‘रेडी टू युज’ असल्यामुळे त्यावर कोणतीही प्रक्रिया वगैरे करावी लागत नव्हती. त्यांनी थेट सुतारांना फेविकॉल विकायला सुरुवात केली. सर्वसामान्य सुतारांचा त्रास फेविकॉलमुळे दूर झाला होता. एक सुतार दुसऱ्या सुताराला फेविकॉलबद्दल सांगू लागला. त्यामुळे प्रॉडक्टची प्रसिद्धी वेगाने झाली. फेविकॉल भारतात एवढे लोकप्रिय झाले की, घराघरात आज कोणतीही वस्तू, चप्पल जरी चिकटवायची झाली तरी फेव्हिकॉलचा वापर करतात.
बळवंतजी यांनी कोण काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला काय वाटतंय, आपल्याला काय करायचं आहे, यावर अधिक लक्ष दिलं. ते आपल्या ध्येयाबद्दल अधिक सजग होते. त्यांचा निर्धार पक्का होता. त्यामुळेच ते ठामपणे निर्णय घेऊ शकले. शिवाय त्यांच्या व्यवसाय करण्याच्या निर्णयामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वकिलीचा पर्याय उपलब्ध असताना देखील त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. ते मागे फिरले नाहीत. समस्येत संधी शोधण्याची वृत्ती त्यांच्याकडे होती. या वृत्तीनेच त्यांना यशाचा मार्ग मिळाला.
आजमितीला फेविकॉलची अधेसिव्ह मार्केटमध्ये मक्तेदारी आहे. यासोबत त्यांचे फेविक्विक, एम सिल या दोन ब्रँडनीही आपापल्या मार्केटमध्ये ७०%च्या आसपास बाजापेठ काबीज केली आहे. फेविस्टिक, डॉक्टर फिक्सिट अशा अनेक ब्रँडची मालकीही ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’कडे आहे. २०१२च्या फोर्ब्सच्या भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत बळवंतजी ४५व्या स्थानी विराजमान होते. २०१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. यशाला ‘चुटकी में’ चिकटण्यासाठी आपल्याकडे प्रयत्नांचा, कष्टाचा ‘फेविक्विक’ असणे, आवश्यक आहे. जो बळवंतजी यांच्याकडे होता. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.
इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू…
लेखक : श्री. संदीप पाटील, दुधगाव, 9096320023〰️〰️〰️〰️〰️〰️रोज संध्याकाळी ६ वाजता नवी अर्थक्रांतीवर
https://naviarthkranti.org/
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti