शकुंतला देवी म्हणजेच ह्युमन कॉम्प्युटर. आपल्या हयातीत एक आश्चर्य म्हणून गणल्या गेलेल्या शकुंतला देवी यांच्या ९० वी जयंती
शकुंतला देवी… 1982 मध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली. त्यासाठी 1980 मध्ये त्यांनी संगणकालाही पराभूत केल्याची नोंद करण्यात आली. 13 आकडी दोन संख्याचा गुणाकार त्यांनी फक्त 28 सेकंदात पूर्ण केला.
18 जून 1980 मध्ये त्यांना 7,686,369,774,870×2,465,099,745,779 अशा दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इंपिरीयल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले. त्यासाठी कोणतंही लॉजिक नव्हतं. त्यानंतर त्यांनी या दोन आकड्यांचा बिनचूक गुणाकार करून 18,947,668,177,995,426,462,773,730 हे उत्तर दिलं ते ही फक्त 28 सेकंदात. त्यांच्या या कुशाग्र बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुकने करताना याच घटनेचा उल्लेख केला आहे.
शकुंतला देवी यांचा जन्म बेंगलोरमधील. पारंपरिक कन्नड ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 चा. त्यांच्या वडिलांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे भिक्षुकी आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्यास नकार देत सर्कसमधील नोकरी पत्करली.
शकुंतला देवी फक्त तीन वर्षांच्या असताना, त्यांना खेळण्याच्या पत्त्यातील काही ट्रिक शिकवत असताना त्यांची कुशाग्र बुद्धी आणि स्मरणशक्ती वडिलांच्या लक्षात आली. मग त्यांनी सर्कशीतील नोकरी सोडून देऊन छोट्या शकुंतलेला घेऊन तिच्या स्मरणशक्तीवर आधारीत रस्त्यावरील खेळ करायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांचं कसलंही औपचारिक शिक्षण झालं नव्हतं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी मैसूर विद्यापीठात आपल्या कुशाग्र बुद्धीचा नमुना पेश केला.
शकुंतला देवी 1944 मध्ये लंडनला रवाना झाल्या. 60 च्या दशकात त्या भारतात परतल्या. परितोष बॅनर्जी यांचा विवाह झाला. कोलकात्याचे रहिवासी असलेले परितोष आयएएस होते. या जोडप्याचा 1979 मध्ये घटस्फोटही झाला. त्यानंतर त्या बेंगलोरला परतल्या.
1944 ला लंडनला गेल्यावर त्यांनी संपूर्ण जगाची सफर केली. आपल्या बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार त्यांनी संपूर्ण जगभरात दाखवून आपल्या कौशल्याची दखल घ्यायला भाग पाडलं.
1950 मध्ये युरोप आणि 1976 मध्ये अमेरिकेत त्यांनी आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवून दिली. आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षाही अधिक वेगाने गणिते पूर्ण करून त्याची उत्तरे परिक्षकांना हजर केली.
भारतात परतल्यावर पुन्हा 1988 मध्ये त्या अमेरिकेला गेल्या. यावेळी त्यांना विशेष आमंत्रण होतं, बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचं. या विभागातील एक प्राध्यापक आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन सुरू केलं. प्राध्यपक जेन्सन यांनी त्यांच्यावर अनेक प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचं धनमूळ काढणं किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा आठवा घात काढायला सांगितलं की त्या क्षणात उत्तर हजर करायच्या.
जेन्सन यांनी असं नमूद केलंय की आपल्या वहीन पूर्ण आकडा लिहिण्यापूर्वीच त्यांना सांगितलेलं गणित त्या सोडवायच्या. 1990 मध्ये इंटेलिजन्स या ख्यातकिर्त जर्नलमध्ये प्राध्यापक आर्थर जेन्सन यांनी शकुंदला देवींविषयीचा प्रबंध प्रकाशित केला.
आपल्या गणितीय कौशल्याशिवाय शकुंतला देवींनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यामध्ये फलज्योतिषासह, पाककला आणि अनेक कादंबऱ्याचाही समावेश आहे. त्यांनी समलैंगिकतेविषयीही एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलंय.
शकुंतला देवी याचं निधन २१ एप्रिल २०१३ रोजी बेंगलोरमधील एका हॉस्पिटलमध्ये झालं. त्यावेळी त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे अनुपमा बॅनर्जी ही एक मुलगी आहे.
सौजन्य – एबीपी माझा
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक… थक्क करणारा प्रवास
प्रमुख सात चुका जे बहुतेक नवीन उद्योजक करतात…
मला उद्योजक व्हायचंय! सेमिनार
पंतप्रधानांचं घर, राष्ट्रपती भवन, संसद भवनाचं स्वच्छतेचं काम या मराठी उद्योजकाकडे आहे
१७व्या वर्षी रस्त्यावर सिमकार्ड विकायचा, २३व्या वर्षी बनला ६००० कोटींचा मालक
Copyright © 2015 - 2022 Navi Arthkranti